ताज्याघडामोडी

खेळता-खेळता दीड वर्षाचं बाळ शेततळ्यात पडलं; वाचवायला गेलेल्या बापाचाही मृत्यू

खेळता दीड वर्षाचा चिमुकला शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी पित्याने देखील शेततळ्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडू लागले, पोटच्या मुलाला आणि पतीला बुडताना पाहून महिलेनेही पाण्यात उडी घेतली. यावेळी ती सुद्धा बुडू लागली. महिलेने आरडाओरड केली असता, आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मदतीला धावले. त्यांनी महिलेला सुखरुप पाण्याबाहेर काढले. 

या घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्यासह पित्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारी ही दुर्देवी घटना पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील जवळील पंचतळे परिसरात रविवारी (ता. ३० एप्रिल) साडेपाचच्या सुमारास घडली. सत्यवान शिवाजी गाजरे (वय २५) व राजवंश सत्यवान गाजरे (वय दीड वर्षे) अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत.

स्नेहल सत्यवान गाजरे यांना स्थानिक तरुणांनी तातडीने तळ्यातून बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सत्यवान गाजरे यांच्या वडिलांच्या नावे जांबूतजवळ पंचतळे येथे चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र व गार्डन मंगल कार्यालय असून, मागील बाजूस जवळपास २० फूट खोल शेततळे आहे.

सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सत्यवान पत्नी स्नेहल व मुलगा राजवंश याच्यासह या कृषी पर्यटन केंद्रात आले होते. यावेळी फेरफटका मारत असताना राजवंश नजर चुकवून खेळता खेळता शेततळ्यात पडला. ते पाहून सत्यवान यांनी त्याला वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने ते देखील बुडू लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *