Uncategorized

‘विठ्ठल’च्या ऑफलाईन सभेपासून पळ काढतोय हा आरोप पूर्ण निराधार आणि खोटा

श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद शेतकरी बांधव,कामगार यांच्या मनामध्ये काही लोकांकडून सर्वसाधारण सभेविषयी आणि कारखान्या विषयी अफवा पसरवून संभ्रम निर्माण करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून संस्थेचा चेअरमन या नात्याने मी खुलासा करत आहे.
१४मार्च रोजी झालेल्या कारखाना संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कारखान्याची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने कारखाना कार्यस्थळावर घेण्याचे योजले होते, त्यानुसार सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांच्याकडे आपण ऑफलाइन सभेच्या पूर्वपरवानगी साठी विनंती अर्ज हा 15 मार्च रोजी त्यांच्या कार्यालयात जाऊन दिला होता मात्र ऑफलाइन सभेस त्यांनी नकार दिला व परवानगी नाकारली त्यानुसार कारखाना प्रशासनाने 16 मार्च रोजी ऑनलाइन सभेसाठी सभासदांना नोटीस काढली.त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी 15 मार्च रोजी आपण केलेल्या ऑफलाईन सभेच्या मागणीला पूर्वी जो तोंडी नकार दिला होता त्याच अर्जावर 17 मार्च रोजी आपल्याला पत्र देऊन लेखी आदेश काढला त्यानुसार त्यांनी सांगितलं की 8 जानेवारी 2022 च्या शासकीय आदेशानुसार कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही आणि सोलापूर जिल्ह्यात ही तो प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे कोणताही सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमास फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत घेण्याची परवानगी देण्यात येईल पण आपली सभासद संख्या 28000 असल्याने कार्यस्थळावर गर्दीचे प्रमाण मोठे होईल म्हणून आपण ऑनलाईन पद्धतीनेच आपली सर्वसाधारण सभा घ्यावी असा उल्लेख त्या प्राप्त आदेशामध्ये दिला आहे म्हणून त्यांच्या आदेशाच पालन करणे हे आपलं कर्तव्य आहे म्हणून सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी लागणार हे स्पष्ट होतय त्यामुळे कारखाना प्रशासन ऑफलाईन सभेपासून पळ काढतय हा आरोप पूर्ण निराधार आणि खोटा आहे हे उघड होत.
2) विषय क्रमांक 13 हा सभासद लोकांच्या सभासदत्व याला धोका होऊ नये म्हणून आहे,व कारखाना प्रशासन त्यांच्या सभासदत्वाच सरंक्षण करण्यासाठी तो विषय घेत आहे.
सर्वसाधारण सभेपुढे ठेवलेल्या 14 विषयांपैकी विषय क्रमांक 13 याबाबतीत काही लोकांकडून जाणूनबुजून गैरसमज निर्माण केला जात आहे म्हणून चेअरमन या नात्याने मी सभासद बांधवांना कारखान्याच्या 28000 सभासदामधील 4 हजाराहून जास्त महिला भगिनी आहेत त्या सर्वसाधारण सभेस सहसा उपस्थित राहत नाहीत आणि जे काही जेष्ठ सभासद आहेत ते प्रकृती कारणास्तव उपस्थित राहू शकत नाहीत त्यामुळे 97 व्या घटनादुरुस्ती मुळे त्यांच्या सभासदत्व याला सभेस अनुपस्थित राहिल्याने धोका होऊ नये म्हणून आपण उलट त्यांची पूर्वपरवानगी आहे असं सभेस सांगून त्यांच सभासदत्व कायम ठेवण्याच कर्तव्य करतो.जे आपण पूर्वीपासून करत आहोत.
बाकी चेअरमन या नात्याने मी माझ्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून ऊस उत्पादक शेतकरी,वाहतूक ठेकेदार आणि कामगार यांची देणी देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यासाठी मी वरिष्ठ स्तरावर रोज गाठीभेटी घेऊन प्रयत्न करत आहे,पण बँक कोर्टात गेल्याने प्रकरण थोडं क्लिष्ट झालं होतं त्यातूनही आपण मार्ग लवकरच काढून सगळी देणी देऊन पुढच्या सीझनमध्ये कारखाना सुरू करण्यास कटिबद्ध आहे,मात्र या ज्या कारखान्याला सध्या अडचणी आल्या आहेत त्या मानवनिर्मित आहेत काही लोकांनी मुद्दाम जाणून बुजून शासकीय स्तरावर व राजकीय स्तरावर चुकीची माहिती देऊन कारखाना अडचणीत आणला आहे पण चेअरमन या नात्याने सर्व बाबीची सोडवणूक करून सर्व देणी दिल्यानंतर मी एक पत्रकार परिषद घेऊन सर्व गोष्टींचा भांडाफोड हा पुराव्यानिशी करून सगळं वास्तव कारखाण्याचे मालक असणाऱ्या सभासद बंधू भगिणी यांना सांगेन.
टीप-सदर खुलाश्या बरोबरच ऑफलाईन सर्वसाधारण सभेस मागितलेली परवानगी पत्र आणि सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेलं उत्तररूपी आदेश मी जोडत आहे.
आपला-भगीरथ भारत भालके
चेअरमन.श्री विठ्ठल सह साखर कारखाना.
वेणूनगर,गुरसाळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *