अरविंद प्रमोद भोसले वय-45 वर्षे व्यवसाय-ट्युरिस्ट रा.मारुती सुझुकी शोरुमच्या पाठीमागे वाल्मिकी नगर इसबावी यांनी दिनांक १५ मार्च रोजी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दि.12/03/2022 रोजी दु.12/00वा.चे सुमारास फिर्यादी हे पत्नी चंदा,मुलगा अनीकेत ,व सुन प्राप्ती व वडिल प्रमोद तुकाराम भोसले असे स्वतच्या इर्टीगा गाडिने मालवण व गणपत पुळे येथे देवदर्शनाकरीता गेले होते. दि.14/03/2022सायं.07/00वा.चे सुमारास पंढरपुर येत असताना रात्रौ 03/30 वा.चे सुमारास सांगोल्याचे जवळ आले असता त्यांचा भाऊ प्रशांत भोसले याच्या मोबाईल नंबर 7020973524 वरुन फोन आला की,रात्री 02/00 वाचे सुमारस माझी पत्नी शितल ही बाथरूम करीता दरवाजा उघडु लागली असता दरवाज कोणीतरी बाहेरून लावलेला दिसला. त्यावेळी पत्नीने झोपेतुन उठवले आपला घराच्या दरवाज्याला बाहेरून कोणी तरी कडी लावली आहे असे सागीतलेने शेजारी राहणारे गणेश पोळ यांना फोन करून कडी उघडण्यास सांगीतले असता त्यांनी येवुन आमच्या घराची कडी उघडी त्यानंतर आम्ही बाहेर आलो असता तुमच्या घराचा दरवाज उघडा दिसला म्हणुन आम्ही तुमच्या घराजवळ जावुन पाहीले असता घरचा कडी कोयडा तोडलेला दिसले आहे तुमच्या घरी चोरी झाली आहे तुम्ही कुठे आहात असे त्यांनी सांगीतले, त्यावेळी फिर्यादीने त्यांना सागोल्याचे जवळ पास आलो आहे असे सांगितले.
घरामध्ये गोदरेजचे लोखंडी कपाट व फर्निचर लाकडी कपाट होते त्यातील लोखंडी कपाट कपाट उचकटलेले दिसले लॉकर कडे बघीतले आसता लॉकरही तोडलेले दिसले व त्यामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम दिसुन अली नाही. चोरीस गेलेले सोन्या चांदाचे वर्णन खालील प्रमाणे
1) 3,20,000 रु किं पिळ्याच्या सोन्याच्या धातुच्या अंगठ्या प्रत्येकी एक तोळा वजनाच्या एकुण
8 अंगठ्या आ .जु.वा.किं अ
2)1,50000 रु किं सोन्याचे धातुचे ब्रेसलेट साडेतीन तोळ्याचे वजनाचे आ .जु.वा.किं अ
3)1,50000 रु किं सोन्याचे धातुचे लॉकेट साडेतीन तोळा वजनाचे आ .जु.वा.किं अ
4)1,50000 रु किं सोन्याचे धातुचे साडेतीन तोळ्याचे गंठंन आ .जु.वा.किं अ
5)1,50000 रु किं सोन्याचे धातुचे कानातील झुबे फुले व पत्तीची डिझाइन असलेले तीन तोळे वजन.जु.वा.किं अ
6) 300000 रू कि.दि.पंढरपुर मर्चंट को.ऑपरेटिव बँक लिमीटेड मधुन FD मोडलेली रोख रक्कम
असे एकुण 12,20000 रु किं
सदर गुन्ह्याचे कामे चार तपास पथके बनवण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मा. तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक मा. हिम्मत जाधव साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी मा. विक्रम कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत. सदर गुन्हा आणि गुन्हेगारा बाबत धागेदोरे मिळाले असून गुन्हा उघडकीस आणण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू केला आहे.