मुंबई : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे, तर दुसरीकडे सरकारने जागतिक क्रूड तेलाच्या किंमती नियंत्रणा बाहेर असल्याने आपण काहीही करु शकत नाही असे म्हणत सरकारने आपले हात वर केले आहेत की, आम्ही यात काहीही करु शकत नाही. मग खरोखर आपल्याकडे पेट्रोल व्यतीरिक्त दुसरा काहीच पर्याय नाही? भविष्यकाळात दर कमी होण्याची काही शक्यता नाही? यावर सर्व ब्रोकरेज हाउस आणि तज्ज्ञांचे मत आहे की, नाही कच्चे तेल स्वस्त होणार नाही.





