ताज्याघडामोडी

शेती परवडत नाही, वाईन विकायची परवानगी द्या; शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी

मुख्यमंत्री साहेब मागील वर्षापासून शेतीत उत्पन्न होत नसल्याने शेती परवडत नाही म्हणून किराणा दुकानात वाईन विकायची परवानगी दिली न तशीच परवानगी आम्हाला ही द्या, अशी अजब मागणी एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. त्याच्या ह्या अजब मागणीची जिल्ह्यात चर्चा होतेय.

शेतकरी जयगुनाथ गाढवे हे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या निलब गावातील रहिवाशी आहेत. निलज बु परिसरात ऑक्टोबर २०२१ला चक्रीवादळाचा फटका बसला होता. त्यात जयगुनाथसह गावातील अनेक शेतकऱ्यांच्या धानाची शेती भुईसपाट झाली होती. शेतीचे पंचनामे झाले तरी एवढे दिवस लोटूनही शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाईचा लाभ मिळालेला नाहीये.

या प्रखरणी गावातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडून तातडीची नुकसान भरपाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यातच, शासनाने मागील वर्षीपासून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणे बंद केले. या संपूर्ण अडचणींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक चटके बसत असल्याचे गाढवे यांनी म्हटलं आहे.

शेतात पिक घेताना लागत असलेले खत, यूरिया व मिळत असलेले उत्पन्न ह्यात तारतत्म्य बसले नाही. तर, दूसरीकडे मुलांना शाळेत पाठवायला लागत असलेला शैक्षणिक खर्च, कुटुंबाच्या आरोग्यावर होणार खर्च हे सर्व शेतीच्या उत्पन्नामधुन करणे शक्य होत नाही.

त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आपण किराणा दुकानात वाईन विकायची परवानगी दिली तशी मलाही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लवकरात लवकर मला वाईन विक्रीची परवानगी मिळाली अशी मागणी गाढवे यांनी मुख्यमंत्री यांना पत्रात केली आहे. गाढवे यांनी तशा आशयाचे पत्र चक्क स्पीड पोस्टने केले आहे. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चक्क वाईन विक्रीची परवानगी मागण्यासाठी पत्र पाठविल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अजब गजब मागणीची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *