ताज्याघडामोडी

4 वर्षांच्या मुलीने केला पुनर्जन्माचा दावा; सत्यता आढळल्याने सर्वांनाच बसला धक्का

मृत्यूनंतरचे जीवन आणि पुनर्जन्म याबाबत अनेक दावे करण्यात येतात. मात्र, त्याबाबत ठोस काहीच माहिती आणि पुरावे आढळत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.

मात्र, राजस्थानातील एका चार वर्षांच्या मुलीने पुनर्जन्माचा दावा केला असून तिने आधीच्या जन्मातील अनेक गोष्टी आणि तिचा मृत्यू कसा झाला, याबाबत केलेल्या दाव्यांमध्ये सत्यता आढळल्याने गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील परावल गावात रतनसिंह चूंडावत हॉटेलमध्ये काम करत असून त्यांना 5 मुली आहेत. त्यांची सर्वात छोटी मुलगी 4 वर्षांची किंजल नेहमी तिच्या भावाला भेटण्यासाठी हट्ट करत होती. तसेच ती पुनर्जन्माबाबत काही दावेही करत होती. सुरुवातीला आम्ही तिच्याकडे लक्ष दिले नाही, असे तिचे आजोबा रामसिंह चुडावत यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी तिच्या आईने वडिलांना बोलावण्यास सांगितले, तेव्हा किंजल म्हणाली, माझे वडील तर पिपलांत्री गावात आहेत. ते गाव त्यांच्या गावापासून 30 किलोमीटरवर आहे.

पिपलांत्री गावात 9 वर्षांपूर्वी उषा नावाच्या महिलेचा जळून मृत्यू झाला होता. आपणच उषा असल्याचा दावा किंजलने केला आहे. तसेच हा आपला पुनर्जन्म असल्याचेही तिने सांगितले. तिने केलेल्या दावांमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ती सांगत असलेल्या गोष्टीतील तथ्थ शोधण्यासाठी तिचे वडील आणि आजोबा पिपलांत्री गावात गेले, त्यावेळी किंजलने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असल्याचे त्यांना समजले आणि त्यांनाही धक्का बसला.

पिपलांत्री गावात आपण कुटुंबासह राहत होतो. आपला आगीत जळून मृत्यू झाला. त्यावेळी अॅम्बलन्स आपल्याला या गावात सोडून निघून गेली. हा आपला पुनर्जन्म असून आपल्याला दोन भाऊ आणि बहीण आहेत. त्यांना भेटायचा हट्ट तिने धरला. ही गोष्ट पिपलांत्री गावात समजताच उषाचा भाऊ पंकज किंजलला भेटायला पिरावलमध्ये आला. त्याला पाहताच किंजलला आनंद झाला. हा आपला भाऊ असल्याचे तिने सर्वांना सांगितले.

किंजल आई-वडील आणि आजोबांसह नुकतीच पिपलांत्री गावात जाऊन आली. किंजलला भेटल्यावर असे वाटले की, ती आमच्या घरात अनेक वर्षांपासून राहत आहे, असे उषाच्या आईने सांगितले. गावातील अनेक महिलांना ओळखत असल्याचे सांगत किंजलने त्यांच्याशीही संवाद साधला. तसेच आपल्या अवडीच्या फुलांचे झाड कोठे आहे, अशी विचारणाही केली. भाऊ आणि बहीणीशाींही तिने गप्पा मारल्या.

किंजलने पिपलांत्री गावाला भेट दिल्यानंतर उषाच्या कुटुंबियांशी तिचा जिव्हाळा वाढला आहे. त्याच्याशी रोज ती फोनवरून संवाद साधते. किंजल आमच्याशी बोलत असताना उषाच आमच्याही बोलत आहे, असा भास होत असल्याचे उषाच्या कुटुंबियांनी सांगितले.

किंजल मागच्या जन्माबाबतच सर्व सांगत असल्याने तिच्या कुटुंबियांना तिला मानसोपचार तज्ज्ञांकडेही नेले होते. मात्र, काही मुलांना मागच्या जन्मातील गोष्टी आठवतात. आठवर्षानंतर तिच्या मागच्या जन्मातील आठवणी कमी होतील, असे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, किंजलने मागच्या जन्मातील केलेले दावे आणि त्यात सत्यता आढळल्याने गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून याची चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *