गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डीजे च्या आवाजाने पोल्ट्री फार्म मध्ये 63 कोंबड्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच जात आहे. मात्र प्राण्यांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण तसे नगण्यच आणि त्यातही एकाच वेळी अनेक प्राण्यांना हार्ट अटॅक येणे ही अविश्वसनीय गोष्ट आहे.

मात्र ही दुर्दैवी घटना सत्यात घडली आहे ती म्हणजे ओडिशातल्या बालासोर इथे. याठिकाणी चक्क ६३ कोंबड्यांचा एकाच वेळी हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

बालासोरच्या एका पोल्ट्री फॉर्मवर 63 कोंबड्या हार्ट अटॅकने दगावल्याची समोर आले आहे. मात्र या कोंबड्यांच्या मृत्यूसाठी कारण ठरली ती म्हणजे पोल्ट्री फार्मच्या दारातून गेलेली लग्नाची वरात.

ओडिशातलं एक महत्वाचे शहर आहे बालासोर. याच शहरात रविवारी एक वरात निघाली. या वरातीत मोठ्या आवाजात डीजेदेखील लावण्यात आला होता. दरम्यान, याच मार्गावर रणजितकुमार परीदा यांचा पोल्ट्री फार्म आहे. त्यात दोनएकशे कोंबड्या होत्या. वरात वाजत पोल्ट्री फार्मच्या जवळ आली. दरम्यन, डीजेच्या आवाजाने खुराड्यातलय कोंबड्या सैरभैर झाल्या.

दरम्यान, फार्म मालक पिरादा हे वरातीवाल्यांना त्यांनी पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांची काय अवस्था आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे म्हणणे कुणीही ऐकण्याच्या मन;स्थितीत नव्हते. त्यानंतर पिरादा परत पोल्ट्री फार्मवर आले तर काही कोंबड्यांनी मान टाकलेली होती. काही मरुन पडले होते. डीजेच्या आवाजानं पोल्ट्री फार्मवर मृत्यूचे तांडव आले होते. बघता बघता 63 कोंबड्या पंधरा मिनिटाच्या आत दगावल्या.

पोल्ट्री मालकाने व्हेटरनरी डॉक्टरला पाचारण केले. त्यांनी मेलेल्या कोंबड्यांची तपासणी केली आणि शेवटी ह्या 63 कोंबड्यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकनेच झाल्याचा रिपोर्ट दिला. डॉक्टरांच्या रिपोर्टनंतर मात्र मालक पिरादा यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि वरातीवाल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *