गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

इसबावी येथे अवैध वाळू वाहतुकीवर शहर पोलिसांची कारवाई

पंढरपूर शहराचे उपनगर असलेल्या इसबावी येथील दूध पंढरीसमोर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री  उशिरा केलेल्या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे.
 
या प्रकरणी सुनिल सुभाष सातपुते, वय 21 वर्षे, रा. तावशी, ता. पंढरपूर सध्या रा. इसबावी, पंढरपूर, कुमार कोळी, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर,व एक अज्ञात इसम यांच्या विरोधात पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 379, 34 सह गौण खनिज कायदा कलम 4 (1), 4 (क), (1), 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या प्रकरणी पोलिसांनी अशोक लेलंड कंपनीची दोस्ती मडेलची पांढ-या रंगाचा टमटम तिचा आर.टी.ओ. नं. एम.एच. 13 डी.क्यु. 0140 हे वाहन ताब्यात घेतले असून या कारवाईत पो.ना.पठाण,पो.हे.कॉ. गोसावी,पो.ना.शेख,पो.कॉ. भुसे, पो.कॉ. रेडे, चा.पो.कॉ. खेडकर यांनी सहभाग घेतला.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *