Uncategorized

आधार मोबाईल लिंकिंग शिबिराची तहसील कार्यालय येथे उत्साहात सुरुवात

शासनाच्या विविध डीबीटी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळण्यासाठी,पॅन कार्ड ,ड्रायव्हिंग लायसेन्स,पासपोर्ट इ. काढण्यासाठी, वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेसाठी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज करण्यासाठी, स्वतःच्या स्वतः आधार मध्ये किरकोळ बदल करण्यासाठी तसेच आपल्या आधार कार्ड चा इतरांकडून होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी आधार अद्ययावतीकरण आधार सोबत मोबाईल लिंक करणे आवश्यक आहे .यासाठी पंढरपूर डाक विभाग आणि तहसील कार्यालय , पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज तहसील कार्यालय पंढरपूर येथे मा. श्री. मनोज शोत्री , नायब तहसीलदार पंढरपूर यांचे प्रथम आधार मोबाईल लिंक करून आज पासून सुरू झालेल्या चार दिवसीय विशेष शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.सदर प्रसंगी पंढरपूर डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक श्री.आर.बी. घायाळ , बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री.‌ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, तक्रार निवारण अधिकारी श्री .सचिन इमडे, शाखा डाकघर रांजणी व चळेचे शाखा डाकपाल श्री. सुधीर इंगळे व आदिनाथ कुंभार, शेतकरी श्री.गणेश देशमुख सह कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. दिनांक २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित केलेल्या विशेष शिबिराचा सर्व लाभार्थी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अधिक्षक डाकघर पंढरपूर विभाग,पंढरपूर आणि तहसील कार्यालय ,पंढरपूर यांचे मार्फत करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *