गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पेट्रोल पंप टाकण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी केला जात होता छळ

पंढरपूर शहरातील एक प्रतिष्ठित कुटूंब म्हणून ख्याती असलेल्या व एकेकाळी पंढरपुर शहराच्या राजकारणात मोठे वजन असलेल्या मांगले कुटूंबात प्रथमच सुनेने आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मयत अबोली मांगले यांचा सासरी छळ होता होता अशी प्रतिक्रिया आज माध्यमांशी बोलताना मयत अबोली अंकित मांगले हिचे वडील संतोष बाळकृष्ण पातूरकर यांनी व्यक्त केली होती व लग्न झाल्यापासून मुलीचा सासरी छळ होत होता असा आरोप केला होता.आता या बाबत त्यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात सविस्तर फिर्याद दाखल केली असून 25/01/2014 रोजी लग्न झाल्यापासून मयत अबोली यांचा सासरी कसा छळ केला जात होता याची सविस्तर माहिती या फिर्यादीत नमूद केली आहे.
काय आहे मयत अबोली अंकित मांगले यांच्या वडिलाची फिर्याद वाचा सविस्तर
फिर्याद तारीख 09/09/2021मी श्री.संतोष बाळकृष्ण पातूरकर,वय 55वर्षे, धंदा-व्यापार (बांगडी दुकान)रा. गट क्र01,शिवाई बिल्डींग, दत्त मंदीराजवळ, धायरीगाव, सिंहगड रोड,पुणे मोबाईल नंबर 9552716980 समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब लिहून देतो की, वरील ठिकाणी मी, माझी पत्नी सौ.सुवर्णा वय 50वर्ष, मुलगा गणेष वय 22 वर्ष असे एकत्र राहत राहणेस असून धायरीगाव, सिंहगड रोड,पुणे येथे माझे बांगडया विक्रीचे दुकान असून ते चालवून कुटूंबाची उपजिवीका करत असतो. मला राधिका, संजीवनी, अबोली अशा एकुण तीन मुली असून पैकी अबोली वय 30 वर्ष हिचा विवाह दिनांक 25/01/2014 रोजी अंकित अंजीश मांगले वय 37 वर्ष रा. लिंक रोड जिजाउ नगर पंढरपूर यांचे सोबत झाला असून तिस मुलगी शताक्षी वय 4 वर्ष मुलगा रिध्दीत वय 2 वर्ष अशी दोन अपत्य आहेत. मुलीचे सासरी तिची सासू अमृता अंजीश मांगले,तिचा पती अंकित अंजीश मांगले तसेच तिची नणंद अपूर्वा रोहित भुमकर असे राहणेस आहेत.
मुलगी अबोली अंकित मांगले हिचा विवाह आम्ही धायरीगाव, सिंहगड रोड,पुणे येथे करुन दिला होता व लग्नाचा सर्व खर्च मीच केला होता तसेच मुलगी अबोली व जावई अंकित तसेच तिचे सासरच्या लोकांचा योग्य तो मानपान करुन स्त्रीधन म्हणून मुलगी अबोली व जावई अंकित यांना 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागदागीने अंगावर घातले होते व संसारपयोगी सामान घेवून दिलेले होते.मुलगी अबोली अंकित मांगले हिचा विवाह झालेनंतर साधारणपणे दोन दिवसांनी पंढरपूर येथे मुलाच्या घरी रिसेप्शनच्या कार्यक्रम ठेवला होता त्यावेळी माझी मुलगी संजीवनी रविकिरण कानडे ही तिचे सोबत गेलेली होती रिसेप्शनच्या कार्यक्रमाच्या दिवशी अबोली हिची सासू अमृता, जावई अंकित, नणंद अपूर्वा यांनी मुलीस तूइया घराच्यांनी लग्नात आमचा चांगला मानपान केला नाही, तुझे शिक्षण आमच्या प्रतिष्ठेच्या मानाने कमी आहे आमच्या मुलाला तुइयापेक्षा जास्त सोने देणारे चांगला मानपान करणारे लोक आमचेकडे आले होते असे बोलून तिला त्रास देण्यास सुरवात केली त्यावेळी माझे मुलीने या सर्वांना प्रतिउत्तर देताच जावई अंकित यांनी तिस मारहाण देखील केली होती हा सर्व घडलेला प्रकार मला मुलगी संजीवनी हिचेकडून ती परत आमचेकडे आलेवर समजला होता.त्यानंतरही मुलगी अबोली हिस तिचे सासरकडील वरील लोक हे घरातील लहान सहान कामातील चुका काढून, तुला चांगला स्वयंपाक येत नाही तू गावंढळ बापाची लेक आहे असे म्हणून मानसिक त्रास देत होते प्रसंगी मारहाण करण्याचे प्रकार देखील करत होते हा तिला होत आसलेला त्रास ती आम्हाला फोन वरुन सांगत होती परंतु एखादे मुलबाळ झालेवर होणारा त्रास कमी होईल असे आम्ही तिला समजावून सांगत होतो त्यामुळे मुलगी सासरी नांदत होती.
विवाहा नंतर एक वर्षानी अबोली हिस मुलगी झाली, मुलगी झालेवर आम्हाला मुलगा पाहिजे होता तू चांगल्या पायाची नाही असे म्हणून तिला त्रास देणे चालू केले मुलगी अबोली हिचा त्रास कमी व्हावा म्हणून मी अबोली हिच्या मुलीचा नामकरण विधी माझे घरी करुन दिला व विधीचे वेळी नातीच्या अंगावर सोन्याचे दागीने घालून सासरी पाठवून दिले होते परंतु मुलीस होणारा कोणताही त्रास कमी झाला नाही त्यांची सोन्याच्या दागीन्याची व पैशाची मागणी वाढतच होती परंतु मी मुलीस आता माझी परिस्थीती नाही.माझेकडे पैसे आलेवर तुइया सुखासाठी पैसे देतो अशी समजूत घालत होतो या होणा-या प्रकारात मुलगी अबोली हिची सासू व नणंद सतत जावायास फूस लावत होते तिची नणंद ही तिचे सासरी न राहता गेल्या दिड वर्षापासून तिचे आईकडेच राहत आहे. गेल्या दोन वर्षा पासून जावई अंकित यांनी पेट्रोल पंप टाकण्याची तयारी चालू केली आहे त्यासाठी ते मुलीस आमचेकडून पैसे आणावेत म्हणून सतत तगादा लावत होते त्यामुळे मुलगी अबोली ही मला तसेच माझे पत्नीस कांही तरी पैसे दयावे लागतील पैसे नाही दिले तर तुला आम्ही नांदवणार नाही अशी सासरचे लोक धमकी देत आहेत तसेच सारखा त्रास देवून घराचे बाहेर हाकलून काढत आहेत सासू घर माझे नावावर आहे तू घराचे बाहेर हो असे सतत बोलत आहे असे मुलीने सांगीतलेवर मी माझ्या ऐपतीप्रमाणे तिच्या सासरच्या लोकांना रोख पैसे दिले होते दरम्यानच्या काळात मुलीस मुलगा ही झाला परंतु तिच्या सासरच्या लोकांच्या वागण्यात कांही बदल झाला नाही त्यामुळे मी गेल्या महिन्यात 5 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण देखील मुलीचे अंगावर घातले होते तरी पण त्यांची मागणी थांबत नव्हती त्यांच्या या त्रासाला मुलगी अबोली ही वैतागली होती ती मला जीवन नकोसे झाले आहे असे सतत फोनवरुन बोलत होती.
काल दिनांक 08/09/2021 रोजी रात्री 9.30 वा चे सुमारास मी घरी असताना जावई अंकित यांचा मोबाईल फोन 7020167311 वरुन मला फोन आला त्यावेळी फोनवर जावई अंकित याचा चुलत भाऊ अमित मांगले हे बोलत होते अमित यांनी मला अबोली सिरीयस आहे तुम्ही नवरा बायको ताबडतोब पंढरपूरला या असे सांगीतले त्यावेळी मी त्यांना नक्की काय प्रकार झाला आहे असे विचारले असता त्यांनी जास्त न बोलता मला व माझे पत्नीस पंढरपूर येथे या आलेवर सांगतो असे बोलून फोन बंद केला त्यानंतर मी तसेच माझी पत्नी सुवर्णा, माइया दोन्ही मुली, जावई व इतर नातेवाईक असे पंढरपूर येथे आज दिनांक 09/09/2021 रोजी पहाटे 03.00 वा चे सुमारास पंढरपूर येथे आलेवर माझे पंढरपूर येथील मेहुणे संजय वामनराव वेळापूरे यांची भेट झाली तेंव्हा त्यांनी मला मुलगी अबोली हिने साडीने गळफास घेतल्याचे व तिचे प्रेत पंढरपूर येथील सरकारी दवाखान्यात नेले असल्याचे सांगीतलेवर आम्ही सरकारी दवाखान्यात जावून मुलीचे प्रेत पाहिले तेंव्हा आम्ही मुलीच्या सासरकडच्या लोकांना घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्हाला उत्तर देण्याचे टाळले परंतु मुलगी अबोली हिस तिची सासू अमृता अंजीश मांगले,तिचा पती अंकित अंजीश मांगले तसेच तिची नणंद अपूर्वा रोहित भुमकर हे सतत आमचेकडून सोने व पैसे आणणेसाठी वरीलप्रमाणे सतत शारीरीक मानसिक त्रास देत होते मारहाण करण्याचा प्रकार करुन घराबाहेर हाकलून काढत होते यावरुन आमची खात्री झाली कि, मुलगी अबोली हिने तिच्या सासरकडील लोकांच्या त्रासास कंटाळून तिने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
तरी दिनांक 25/01/2014 रोजी पासून ते दिनांक 08/09/2021 रोजीचे रात्री 21.30 वा सुमारास मयत मुलगी अबोली अंकित मांगले वय 30 वर्ष रा.केशवलीला बंगला, लिंक रोड, जिजाउ नगर ,पंढरपूर हिस तिची सासू अमृता अंजीश मांगले, तिचा पती अंकित अंजीश मांगले तसेच तिची नणंद अपूर्वा रोहित भुमकर यांनी लग्नात आमच्या प्रतिष्ठेच्या मानाने मानपान केला नाही, लग्नात कमी सोने दिले, तुझे शिक्षणच कमी आहे तसेच पेट्रोल पंप टाकण्यासाठी आमचेकडून पैसे आणावेत म्हणून सतत शारीरीक मानसिक त्रास देवून,मारहाण करुन तिला राहते घरी गळफास घेवून आत्महत्या करण्यास प्रवृत केले म्हणून माझी त्यांचे विरुध्द फिर्याद आहे.वरीलप्रमाणे संगणकावर टंकलिखीत केलेली माझी फिर्याद माझे सांगण्याप्रमाणे बरोबर असून वाचून पाहून त्यावर सही केली आहे. समक्ष फिर्यादी सही पोलीस ठाणे अंमलदारपंढरपूर शहर पोलीस स्टेशन. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *