ताज्याघडामोडी

करकंब जि प गटातील शाळा, दवाखाने व रस्त्यासाठी निधी मंजूर-मा सभापती रजनीताई देशमुख

करकंब जि प गटातील शाळा, दवाखाने व रस्त्यासाठी निधी मंजूर-मा सभापती रजनीताई देशमुख

करकंब प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातून तसेच राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून करकंब जि प गटातील प्राथमिक शाळा बांधकाम व दुरुस्ती साठी, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील सुविधा साठी तसेच रस्ते डांबरीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे.

सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी आ प्रशांतराव परिचारक व मा जि प सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागातून करकंब गटाच्या विकासासाठी निधी आणला असल्याची माहिती मा सभापती व जि प सदस्या रजनीताई देशमुख यांनी दिली.

करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत आहेत, त्यांना चांगल्या व जास्तीतजास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम मा जि प सदस्य बाळासाहेब देशमुख हे सातत्याने करीत आहेत, येथील ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी ६३लाख रुपये व उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुरुस्ती साठी तीन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीसाठी करकंब येथील अलंकापुरी, मुले एक , मुले दोन, खारे वस्ती, बार्डी येथील कवडे वस्ती, वाफळकर वस्ती, करोळे,जळोली, उंबरे येथील शाळांच्या दुरुस्ती साठी प्रत्येकी तीन लाखाप्रमाणे एकूण २६ लाख ४२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत, भंडारे वस्ती (करकंब), धनगर वस्ती , जळोली अंगणवाडी दुरुस्ती साठी ३लाख, तसेच आदर्श अंगणवाडी बनविण्यासाठी उंबरे व सांगवी येथील अंगणवाडी ला प्रत्येकी एक लाख ५७हजार रुपये चे डिजिटल साहित्याचे किट देण्यात आले, याशिवाय जळोली, बार्डी येथील उच्च प्राथमिक शाळा वर्ग बांधकाम करण्यासाठी ३७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

जि प च्या जनसुविधा योजनेतून कवले वस्ती (करोळे), स्मशानभूमी रस्ता (उंबरे), पेहे भोसे रस्ता, सावंत वस्ती रस्ता (खरातवाडी), लक्ष्मी नारायण मंदिर (सांगवी), यल्लम्मा देवी पाणी टाकी (करोळे), बादलकोट रस्ता, स्मशानभूमी सुशोभीकरण (पेहे), चव्हाण वस्ती रस्ता (जळोली) आदी कामांसाठी २३ लाख ५० हजार रुपये तर उंबरे, करोळे, कान्हापुरी, जाधववाडी येथे हायमास्ट दिवा बसविल्यासाठी ५ लाख, जळोली नाला दुरुस्तीसाठी साडेसात लाख रुपये निधी जि प मधून मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी सभापती रजनीताई देशमुख यांनी दिली

१५ व्या वित्त आयोग जि प सदस्य फंडातून व्यवहारे गल्लीतील रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी १० लाख व उंबरे येथील रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी १५ लाख तसेच इंदिरानगर व काळा मारुती वडार गल्ली येथे महिलांना शौचालय बांधण्यासाठी १० लाख रुपये निधी जि प सदस्य रजनीताई देशमुख यांनी दिला आहे.

चौकट
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून व राज्य शासनाकडून करकंब- भोसे – व्होळे रस्त्यासाठी ७ कोटी ८० लाख, करकंब – घोटी रस्त्यासाठी ३ कोटी, उंबरे पूल दुरुस्ती ५० लाख, नवरानवरी ते करकंब १ कोटी ५८ लाख, पेहे – नांदोरे २६ लाख, करकंब- वाफळकर वस्ती २२ लाख, बार्डी – खरातवाडी १० लाख, करोळे – कान्हापुरी २४ लाख, उंबरे – करोळे ५ लाख, बादलकोट – शिमलानगर ५ लाख, रुपये निधी मंजूर झाला आहे.

फोटो
मा सभापती रजनीताई देशमुख यांचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *