महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज पंढरपुरात एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस कडुन करण्यात आला आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.अमरजी सूर्यवंशी व सोलापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष मा.शंकरजी सुरवसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या संकल्पाची सुरुवात करण्यात आली
यावेळी उपस्थितांमध्ये ओबीसी जिल्हाध्यक्ष माननीय समीर कोळी पंढरपुर शहर सचिव बाळासाहेब आसबे, सोमनाथ गांगुर्डे,शिवाजीराजे धोत्रे,गणेश थिटे,विठ्ठल भुमकर इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर शहर युवक कॉंग्रेस चे कार्याध्यक्ष सागर कदम यांनी केले होते.