नवी दिल्ली 10 एप्रिल : कोरोना रुग्णांच्या संख्येेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक प्रचारसभा घेण्यात येत आहेत. अशात प्रचारादरम्यान स्टार प्रचारक आणि नेत्यांनी विना मास्क प्रचार केल्याच्या घटनांचा उल्लेख करत निवडणूक आयोगानं मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं गांभीर्यानं पालक करण्याचं आवाहन केलं आहे.
निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवलं. या पत्रात म्हटलं, की या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आयोगाच्या असं लक्षात आलं आहे, की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या बैठका आणि प्रचारादरम्यान आयोगाकडून जारी करण्यात आलेले निर्देश पायदळी तु़डवले जात आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर यासारख्या नियमांचंही पालन होत नसल्याचं आयोगानं म्हटलं आहे.
पत्रात म्हटलं आहे, की स्टार प्रचारक, नेते किंवा उमेदरावारांसह निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या संख्येत उपस्थित राहाणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं थेट इशारा दिला, की निर्देशांचं पालन न करणाऱ्या उमेदवारांच्या, स्टार प्रचारकांच्या आणि नेत्यांच्या सभा आणि रॅलींवर बंदी घालण्याचं पाऊलही आयोग उचलू शकतं.निवडणूक आयोगानं नेत्यांना दिला इशारा