नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइनशी संबंधित व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून देण्यात आली आहे. पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून गुन्हा दाखल केला.यापूर्वी ही योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची घटना घडली होती. या प्रकरणामध्ये ज्या क्रमांकावरुन मेसेज आला आहे […]
ताज्याघडामोडी
राज्य सरकारने विकत घेतल्या सुमारे साडेचार लाख कोवॅक्सिन
पुणे – लसीच्या तुटवड्याचे संकट काही दिवसांपुरते मिटणार असून, मंगळवारी राज्याला ‘कोवॅक्सिन’ लसींचा कोटा मिळणार आहे. राज्याने कोवॅक्सिन लस खरेदी केली असून, ती लवकरच राज्याच्या लसीकरण विभागाच्या ताब्यात मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लसींचे संकट उभे राहिले असून, पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अनेक केंद्रांवरील लसीकरण बंद करावे लागले होते. त्यामध्ये जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांचे सेशन्स […]
बोपदेव घाटात नेत पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले ऍसिड; पती अटकेत
पुणे – पत्नीने ती काम करत असलेली जागा न दाखवल्याने पतीने तीला बोपदेव घाटात नेत चेहऱ्यावर ऍसिड टाकले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पती दिनेश शिरपत धुमक(39,रा.बावधान गाव) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनेश त्याच्या 37 वर्षीय पत्नीवर नेहमी संशय घेत होता. तो पेटींगचे काम करतो तर पत्नी धुण्या भांड्याची कामे करते. घटनेच्या दिवशी पती तीला […]
धमकी प्रकरणी पुनावालांनी पत्रकाद्वारे माडंली बाजू
नवी दिल्ली – धमकी प्रकरणी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. गेल्या दोन दिवसात सरकारने ऑर्डर न दिल्यामुळे निर्मिती मंदावल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्यांनी या बातम्याचे खंडन करत पत्रकाद्वारे आपली बाजू मांडली आहे. सरकारकडून आम्हाला सर्वोतोपरी मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. माझ्या वक्तव्याचा […]
आ.परिचारक व आ.आवताडे यांनी घेतली प्रांतकार्यालयात महत्वपूर्ण बैठक
आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा नूतन आमदार समाधान आवताडे यांच्या समवेत प्रशासनाची बैठक घेवून कोरोना रूग्णांसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने वाढत असून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात याची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे विजया नंतर हारतुरे, सत्कार हे स्वीकारण्यापेक्षा समाधान आवताडे यांनी प्रशांत परिचारक यांच्यासह प्रांताधिकारी कार्यालयात यावर उपाययोजना […]
सांगलीत कोरोनाची स्थिती भीषण, रुग्णासाठी ऑक्सिजन बेड मिळेना, रुग्णाला टेम्पोत टाकून वणवण फिरण्याची नामुष्की
सांगली : राज्यात अजून ऑक्सीजन बेडचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड प्रयत्न करावे लागत आहेत. सांगली जिल्ह्यात अशाच प्रकारची एक घटना आज बघायला मिळाली. एका कोरोनाबाधित महिलेसाठी सांगलीत ऑक्सिजन बेड मिळत नव्हता. या महिलेला बेड मिळावा यासाठी तिच्या नातेवाईकांनी प्रचंड खटाटोप केला. सांगतील कोणत्याही रुग्णालयात बेड मिळावा […]
पोटनिवडणुकीत कौल कुणाला ?
समाधान आवताडे यांची निर्णायक आघाडी घेत विजयाकडे वाटचाल पंढरपूर शहर आणि २२ गावांची मतमोजणी संपली आवताडेंना ६१६ मतांची आघाडी पंढरपूर शहर आणि २२ गावात आवताडेंना अपेक्षित आघाडी नाही,आता मदार मंगळवेढा शहर व तालुक्यावर एकूण ३८ फेऱ्यात मतमोजणी प्रक्रिया पार पाडली पोटनिवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी (वेळ साय: ७ वा ) […]
रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने डाॅक्टरसहित 8 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. उपचारांसाठी लागणारी संसाधने कमी पडत आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजनचा देशात तुटवडा आहे. अशातच दिल्लीतील बत्रा रुग्णालयातील आठ जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयाने हायकोर्टात यासंदर्भातील माहिती दिली आहे. करोनाच्या सध्याच्या एकंदर परिस्थितीबाबत […]
सर्व ओझं माझ्या खांद्यांवर आलं, मी एकटा काय करणार?
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी कोरोना लशीच्या उत्पादनाचा प्रचंड दबाव असल्याचं म्हटलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत रौद्र रुप घेऊन आली, त्यामुळं कोविशिल्ड लसीच्या वाढलेल्या मागणीची पूर्तता करताना प्रचंड तणावात असल्याचं त्यांनी म्हटलं. सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीनं देशात कोविशिल्ड या लशीची निर्मिती केली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर लशीची मागणी […]
तुम्ही झोपा काढताय की चपात्या भाजताय?
पुणे, 1 मे: महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. त्यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक लसींचाही तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा राजकारण काही थांबताना दिसत नाहीये. सत्ताधारी केंद्र सरकार वर दुजाभावाचा आरोप करत आहेत तर भाजप नेतेही राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. तुम्ही काय चपात्या भाजत होते का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]










