मध्यप्रदेशात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका भाच्याने मित्रासोबत मिळून मामीवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे घडली आहे. तसेच तिचा विवस्त्र व्हिडीओ करुन तिला ब्लॅकमेलही केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मध्य प्रदेशातील 21वर्षीय महिला नवऱ्यासोबत ग्वाल्हेरच्या हनुमान नगर येथे भाड्याने राहत होती. महिलेचा नवरा मजुरीचे काम करतो. […]
ताज्याघडामोडी
पत्नीच्या मृत्यूचा दाखला मागितला,शिपाई म्हणाला सरपंच,ग्रामसेवक आल्यावर या !
पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पत्नीच्या मृत्यूचा दाखला मागण्यासाठी आलेल्या ग्रामस्थाने केसकरवाडी ग्राम पंचायतीचे रजिस्टर फेकून देत हातात दगड घेऊन ग्राम पंचायत कार्यालयातील कॉम्प्युटरच्या डिस्प्लेर घालून मोडतोड केल्याची फिर्याद ग्रा.प.शिपाई सहदेव बाळु ढोबळे याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनुसार सहदेव बाळु ढोबळे वय-28वर्षे व्यवसाय -नोकरी (ग्रामपंचायत शिपाई मौजे केसकरवाडी) […]
डोक्यावर काठीचे न थकता वार, मुलीच्या प्रियकराची बापाकडून निर्घृण हत्या
समाजात बदनामी होईल, या भीतीने वडिलाने चक्क मुलीच्या प्रियकराच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार करुन त्याची हत्या केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येसगाव येथे घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. अमोल बाळकृष्ण ताल्हण असे मृत युवकाचे नाव आहे. मृताचे येसगाव (मुरगाव) येथील एका युवतीसोबत प्रेम संबंध होते. याची माहिती मुलीच्या वडिलांना […]
खलिस्तान्यांच्या निशाण्यावर PM मोदी! व्हिडिओ जारी करत दिली ‘ही’ धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाबमधील दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेचं कडं तोडल्याचा दावा करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये २३ तारखेला पंजाबच्या लुधियानातील जिल्हा कोर्टात बॉम्बस्फोट झाला. या घटनांमध्ये ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता पंतप्रधान मोदींना पुन्हा रोखण्याचा उघड इशारा ‘शीख फॉर जस्टिस’ च्या […]
“हिंदूंची घरं जळाली तर मुस्लिमांची घरं सुरक्षित कशी राहतील?”; योगी आदित्यनाथ यांचं विधान
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या, पंथाच्या लोकांना त्याचा फटका बसतो. जर हिंदूंची घरं जळाली तर मुस्लिमांची घरं तरी कशी सुरक्षित राहतील. हिंदू सुरक्षित राहिला तर मुसलमान सुरक्षित राहील. आम्ही आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दंगल होऊ दिली नाही. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विधान […]
महिला इन्स्पेक्टरची दादागिरी! ऑन ड्यूटी दाबून घेतले पाय
उत्तर प्रदेशातील संभलमध्ये तैनात असलेल्या महिला इन्स्पेक्टरचा असा फोटो व्हायरल होत असून, त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. वास्तविक, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये महिला इन्स्पेक्टर ड्युटीदरम्यान एका व्यक्तीकडून पाय दाबून घेताना दिसत आहे. हा व्हायरल फोटो एसपींच्या निदर्शनास येताच महिला इन्स्पेक्टरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. यासोबतच एसपी चक्रेश मिश्रा यांनी पिंक चौकीच्या प्रभारी पदी या […]
दिलासादायक! जिम, ब्युटी सलून चालू राहणार; सरकारचे सुधारित आदेश
जिमला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र सरकारने जिम सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे काल (8 जानेवारी) सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहे. निर्बंध लागू करत असताना जिम आणि ब्युटी सलून पूर्णतः बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आज (9 जानेवारी) सरकारने सुधारित आदेश काढत ब्युटी सलून आणि जिम चालू ठेवायला परवानगी […]
पत्नीला आधी दिला करंट पण जीव गेला नाही म्हणून कुर्हाडीने वार
चंद्रपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती, पत्नीत झालेल्या वादाचे रूपांतर क्रूर घटनेत झाले. रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला विद्युत करंट देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्युत करंटने पत्नीचा मृत्यू झाला नाही हे लक्षात येताच पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नीला ठार केले. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना […]
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. रविवारी मध्यरात्री बारा वाजेपासून कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार असून दिवसा पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यास मनाई असेल. शाळा महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळांसह स्विमिंग […]
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर फेरविचार याचिका; १२ जानेवारीला सुनावणी
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेलाय. कारण मराठा आरक्षणासाठी लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर १२ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण नाकारताना नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना नाही, असं सुप्रीम कोर्टाने […]











