नवी दिल्ली – करोनाची साथ नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार ट्विटरवरून झालेली टीका काढून टाकण्यात अधिक मश्गुल आहे, अशी टीका वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत नियतकालिक ‘लान्सेट’च्या अग्रलेखात करण्यात आली आहे. टीका करणाऱ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न आणि या पेचप्रसंगाच्या काळात होणारा खुला संवाद हे अक्षम्य आहे, असे त्यात म्हटले आहे. इन्स्टिट्यूट फॉर […]
ताज्याघडामोडी
वांगणीतील 99 टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसात बरे केल्याचा दावा, डॉक्टरवर गुन्हा दाखल
कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर नजीक असलेल्या वांगणी येथे शिला क्लिनिक ह्या खाजगी दवाखान्याच्या डॉ. उमाशंकर गुप्ता आणि त्याच्या महिला सहकारी डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गुप्ता यांनी कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करत समाज माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची […]
पंढरपूर मध्ये नवीन 200 बेडचे कोविड केअर सेंटर
पंढरपूर मध्ये नवीन 200 बेडचे कोविड केअर सेंटर पंढरपूर दि. 08 : पंढरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वेदांत व व्हिडीओकॉन भक्त निवास मध्ये 200 बेडचे पेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले […]
जेलमधील वाढत्या कोरोना प्रादर्भावाबाबत SC चिंतीत; गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांच्या सोडण्याचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली : तुरुंगात कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या संख्येने कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, सर्व राज्यांत स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने गेल्या वर्षी जारी केलेल्या सूचनेनुसार कैद्यांच्या सुटकेबाबत निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील कोर्टाच्या आदेशावरून अंतरिम जामिनावर कैद्यांची सुटका झाली होती. त्यानंतर सोडलेले सर्व कैदी परत कारागृहात परतले […]
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन, नाशकात खळबळ
नाशिक, 08 मे : नाशिकमध्ये शिवसेनेचे पदाधिकाऱ्याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आळी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक येथील पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. उमेश नाईक असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.असे वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. […]
मास्क न वापरता कोरोनाबाधित रुग्णांवर बिनधास्त उपचार, डॉक्टरावर गुन्हा दाखल
वांगणी, 08 मे : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यातील डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढत आहे. पण, मुंबई जवळील बदलापूर येथील वांगणी इथं एक डॉक्टर मास्क न वापरा कोरोना रुग्णावर उपचार करत असल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर […]
अखेर अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलचा परवाना रद्द
अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाची १४ तास अडवणूक पंढरपुरात ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने पंढरपुरातील एका ७५ वर्षीय कोरोना बाधित वृद्ध महिलेस सांगली येथील अपेक्स केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.पाच दिवस तेथे ऍडमिट असलेल्या वृद्धेस सोबत असलेल्या नातवास व सुनेस देखील भेटू दिले नाही.ती वृद्ध महिला ३० एप्रिल रोजी मरण पावली असता अडीच लाख रुपये भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात […]
बार मालकांना आणि हॉटेलचालकांना सवलत देण्याची शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई : राज्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि रुग्णासंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहार खिठप्प झाले आहेत. हॉटेल व्यावसायिक आणि बार चालकांनाही या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. याचीच दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्यावरून भाजपाचे […]
पंढपुरातील रुग्णाच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल करणारे ‘ते’ हॉस्पिटल बंद करा – आ.गोपीचंद पडळकर
रुग्णास दाखल करून घेतले जाते,उपचारच केले जात नसल्याचा आ.पडळकर यांचा गंभीर आरोप पंढरपूर शहरातील एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेस कोरोनाची लागण झाली,२६ एप्रिल रोजी पंढपुरात ऑक्सिजन बेड न मिळाल्याने वृद्धेच्या नातवाने त्या रुग्णास सांगली येथील अपेक्स केअर हॉस्पिटल येथे दाखल केले.३० एप्रिल रोजी दुपारपर्यंत उपचार सुरु आहेत असेच उत्तर वृद्ध महिला रुग्णाच्या नातवास व सुनेस […]
महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरणाबाबतची नियमावली बदलणार!
मुंबई – १ मेपासून महाराष्ट्रासह देशभरात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार काही राज्यांनी लसींच्या उपलब्धतेनुसार हे लसीकरण सुरू केले. काही मोजक्या केंद्रांवर महाराष्ट्रात देखील त्याची सुरुवात करण्यात आली. पण, लसींचा तुटवडा आणि त्यातून लसीकरण केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता, आता १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य सरकार […]











