वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहतेच्या लग्नाआधी सोबत काढलेले फोटो तुझ्या नवऱ्याच्या व्हाट्सअपवर पाठवेल अशी सतत धमकी देत होता. या सततच्या धमक्यांना कटाळून विवाहतेने अधिक प्रमाणात गोळ्यांचे सेवन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान 2 जुलै रोजी मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि गोळ्या घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्याने सातारा ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शिक्षिकेचा […]
ताज्याघडामोडी
उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार?
मुंबई: राज्याचे विशेष सरकारी वकील अॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अॅ.उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अॅ. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद […]
लाचखोर पोलीस निरीक्षक पवार व स.पो.नि.खंडागळे निलंबित
सलगर वस्ती ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत पवार आणि सहायक निरीक्षक रोहन खंडागळे या दोघांना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शनिवारी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. पोलिस आयुक्त यांनी हे आदेश दिले आहेत. या दोघांवर शनिवारी साडेसात लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली होती. निरीक्षक पवार आणि खंडागळे यांना शनिवारी न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयात […]
तब्बल 26 तलवारी बाळगणाऱ्यास पोलिसांनी केली अटक
लोखंडी पाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल 26 तलवारी बाळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपी एका फायनान्स कंपनीमध्ये कामाला असताना कार्यालय असलेल्या इमारतीच्याच छतावर तलवारी ठेवल्या होत्या. प्रतिक ज्ञानेश्वर भोसले (वय 33, रा. पार्श्वनाथ नगर, जितोजी अपार्टमेंट, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील […]
हत्येसाठी गुगल मॅपची घेतली मदत; लग्नाच्या अवघ्या 15 दिवसात तरुणीने पतीला संपवलं
भोपाळ, 10 जुलै : मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे लग्नाच्या अवघ्या 15 दिवसात नवविवाहितीने पतीची हत्या केली आहे. यासाठी तिने चार वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या प्रियकराची मदत घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, विदिशातील लाटेरी तहसीलच्या मलिया खेडी गावात ही घटना घडली. पत्नी कृष्णा बाईने पतीची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. […]
दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ना नोकरी, ना भत्ता, ना निवडणुकीचं तिकीट; ‘या’ राज्यात लागू होणार नियम
दोनपेक्षा जास्त अपत्यं असणाऱ्या पालकांना सरकारी नोकरी आणि सरकारी योजनांपासून वंचित राहावं लागू शकतं. उत्तर प्रदेशमध्ये ‘टू चाईल्ड पॉलिसी’ची घोषणा रविवारी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रविवारी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण दिवसाचं निमित्त साधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही घोषणा करण्याची शक्यता आहे. काय आहे योजना? वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्याचं उत्तर प्रदेश […]
पंढरपूरात 14 आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना
पंढरपूरात 14 आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना पंढरपूर, दि.10 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आषाढी यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार शासनाने परवानगी दिलेल्या 10 मानाच्या पालख्यांना पंढरपूरात प्रवेश देण्यात येणार. या पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात तसेच आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतही अडचण येऊ नये यासाठी पंढरपूरात 14 […]
२१ वर्षीय नर्सचा विनयभंग करून डॉक्टर गायब
मुंबईजवळच्या नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला आहे.नालासोपारा पूर्व भागातील संतोष भुवन यूपी नाका येथील आरती हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. डॉ. सुशील मिश्रा असे वासनांध आरोपी डॉक्टरचे नाव आहे. आरती हॉस्पिटलमध्ये तो […]
SBI नंतर या बँकेचा मोठा निर्णय; ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल
स्टेट बँक इंडिया पाठोपाठ आता आणखी एका बँकेच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेने ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून सुधारित नियम लागू होतील. हे नियम बचत खाते आणि सॅलरी खाते दोन्हींसाठी बंधनकारक असतील. ICICI बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, येत्या महिनाभरात मुंबई, […]
शिवीगाळ कोणी केली ते योग्य वेळी उघड करेन; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
पुणे -राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निष्क्रीय कारभार भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून उघड केल्याने करोनाचे कारण पुढे करत महाविकास आघाडी सरकारने चर्चेला घाबरून दोन दिवसात राज्याचे विधीमंडळ अधिवेशन गुंडाळत लोकशाहीला कुलूप बंद करण्याचे काम केले आहे. तसेच हे अधिवेशन एकतर्फी चालवित भाजप आमदारा विरोधात शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याचे आरोप करून आमच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. […]











