राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन […]
ताज्याघडामोडी
SBI चा कोट्यावधी ग्राहकांना सतर्कतेचा इशारा, 10 हजार रुपये दंड टाळायचा असेल तर आजच करा ‘हे’ काम
देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेंने त्यांच्या ग्राहकासाठी एक अॅलर्ट जारी केला आहे. जर तुमचेही एसबीआय बँकेत खाते असेल तर तुम्ही याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणींपासून बचाव करायचा असेल तर एसबीआय बँकेच्या ग्राहकांनी पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावे, अशी सूचना दिली आहे. जर एखाद्या बँकेच्या ग्राहकांनी पॅन […]
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार
दहावीचा निकाल काळ जाहीर झाला असून निकालानंतर मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरीही अकारावी प्रवेशाची सर्वाधिक उत्सुकता आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा २१ […]
पंढरपूर साठी विशेष एसटी बसेस सोडू नये
पंढरपूरच्या वारीची लाखो वारकरी प्रतीक्षा करत असतात. पंढरपूरचे अर्थचक्र वारीवर अवलंबून असते. वारीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते असे असले तरी वारीच्या धर्तीवर एकही एसटी गाडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ करू नये, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने संपूर्ण राज्यातील विभागांना दिले आहेत. मंगळवार, २० जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून चार्तुमासारंभ देखील होत आहे. […]
राज्यमंत्रिमंडळात मोठा बदल होणार?
राज्यमंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावर डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर एका राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून नारळ मिळण्याची शक्यता असून यातील एक मंत्री आदिवासी भागातील असून दुसरा मुंबईतील असल्याचं सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसपूस […]
कर्मयोगी इंजीनीरिंग कॉलेज मध्ये 25 जुलै रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
कर्मयोगी इंजीनीरिंग कॉलेज शेळवे, पंढरपूर येथे रविवार दिनांक 25 जुलै 2021 रोजी “रीलीव्हंस ऑफ इंजीनीरिंग अँन्ड सायन्स फॉर एनव्हायरमेंट अँन्ड सोसायटी 2021” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री.पांडुरंग प्रतिष्ठान चे ट्रस्टी श्री. रोहन परिचारक व प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी दिली. कोरोंना च्या महामारीमुळे सदर ची परिषद […]
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यास सुरुवात.
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यास सुरुवात. शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून, शिवसेनेने शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक पंढरपूर शहरातील प्रत्येक भागात, प्रभागात जाऊन सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी […]
दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. परंतु दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग झाली होती. परंतु ही वेबसाईट हँग झाल्याने विध्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दहावीच्या निकालाची वेबसाईट […]
कुर्हाडीने वार करुन तरुणाची हत्या, संशयित मेहुणा पसार
मेहुण्यानेच तरुणाची कुर्हाडीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. संशयित मेहुणा विजय सावकारे घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुक्ताईनगर शहरात गुरुवारी रात्री तरुणाची हत्या झाली. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. विशाल वामन ठोसरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुर्हाडीने […]
न झालेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर
दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के […]











