राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पाडण्यात केंद्रातील भाजपा सरकारचा हात असल्याचा आरोप वारंवार महाविकास आघाडीकडून केले. शिवसेना पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून केंद्रातील सरकार हे राज्यातील सरकार तोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तर काँग्रेस पक्षातील कोणीही भाजपासोबत जाणार नसून, आमचा पक्ष कुत्र्या मांजरांचा नाही तर वाघाचा असल्याचा […]
ताज्याघडामोडी
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती
आघाडीच्या राजकारणाची देशात अपरिहार्यता झाली आहे. त्यामुळेच आम्ही ‘एनडीए’मध्ये सहभागी झालो आहोत. आगामी निवडणुका आम्ही आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर लढविणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. […]
कामावरुन काढल्याचा राग, पुण्यात मॅनेजरची हत्या, दारांना कड्या लावून पळाला खरा, पण…
शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावरुन काढल्याच्या रागातून एका कामगाराने आपल्या मॅनेजरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील वडनेर येथे गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली होती. आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान (वय […]
भरबाजारपेठेत भाजी विक्रेत्याचा सपासप वार करून खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी टोळक्याच्या मारहाणीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस होत नाही तोच नाशिकमधील सिडको परिसरात 4 ते 5 अज्ञातांनी एका भाजी विक्रेत्यांची भरदिवसा हत्या केल्याची घटना गुरुवारी घडलीय. भाजी विक्रेत्यावर धारधार शस्त्रानं हल्ला झाल्यानं नाशिक शहर पुन्हा हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी चार […]
आ.आवताडेंचा पाठपुरावा २५१५ योजनेतील कामांसाठी प्रलंबित १ कोटी निधी उपलब्ध
पंढरपूर तालुक्यातील विविध कामांसाठी ५० लाख मंजूर ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेत वाढ होऊन सार्वत्रिक विकास होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या २५१५ योजनेतून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील २३ गावांसाठी मंजूर असलेला परंतु महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये प्रलंबित असणारा १ कोटी विकास कामांच्या निधीला ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. […]
दानपेटीत १०० कोटींचा चेक मिळाला; बँकेत वठवायला आणला आन् समोर आलं धक्कादायक सत्य
देवदर्शनासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती मंदिरातील दानपेटीत धनादेश दान करत असतो. दान केल्यानंतर समाधानी मनाने व्यक्ती घरी परततात. अशात आंध्रप्रदेशच्या विशाखापटणममधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे.एका व्यक्तीने मंदिरात तब्बल १०० कोटींचा धनादेश असलेला चेक दान केला आहे. मात्र चेक वठवण्यासाठी मंदिर प्रशासन बँकेत गेल्यावर जे घडलंय त्याने सर्वजण संताप व्यक्त करत आहेत. विशाखापटणममध्ये श्रीवराह लक्ष्मी […]
आईने दीड लाखांसाठी केली भयंकर डील, पोटच्या लेकीला हॉटेलमध्ये नेलं अन्…
वेश्या व्यवसायाचे धंदे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक मुलींना कामाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. अशीच एक घटना कोपरखैरणेमध्ये राहणाऱ्या महिलेने स्वतःच्या मुलीचा व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक परस्थिती कमकुवत असल्यामुळे जन्मदात्या आईने पोटच्या गोळ्याला पुढे करून पैसे कमविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला […]
तुमची मुलगी द्या सोनं-पैसे देतो, ४२ वर्षांच्या व्यक्तीची १४ वर्षांच्या मुलीला मागणी, घरचे तयार, पण…
बाल विवाहाचा प्रकार ठाण्यात समोर आला असून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणारा ४२ वर्षांचा नवरदेव, मुलीचे वडील आणि दोन्ही बाजूकडील नातेवाईकांसह अन्य एकजण अशा आठ जणांविरुद्ध नुकताच कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने नवरदेवाने मुलीच्या आई-वडिलांना सोने आणि पैसे […]
दर्जेदार शैक्षणिक उपक्रमांमुळे ‘स्वेरी’ची राज्यात विशेष ओळख -प्र. कुलगुरू डॉ.रजनीश कामत
स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ थाटात संपन्न पंढरपूर- ‘संशोधनातील प्रगतीमुळे सर्वात प्रथम माझ्या कानावर स्वेरीचे नाव आले. त्यावेळी स्वेरीमध्ये संशोधन क्षेत्रात ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क’ चे मोठे प्रोजेक्ट यशस्वी झाले होते. स्वेरी हे महत्त्वाच्या संशोधनाच्या संबंधी प्रबंध व प्रोजेक्ट सादर करणारे सोलापूर विद्यापीठामधील आदर्श महाविद्यालय असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव न […]
बॅनरवर शरद पवारांचे फोटो वापरू नका, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठांच्या सूचना
राष्ट्रवादीतून फुटून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थकांना शरद पवारांनी आपल्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो न वापरण्याची ताकीद दिली होती. तरी देखील अजित पवार गटाकडून फोटो वापरण्यात येत नव्हते. अखेर शरद पवार यांनी कोर्टात जाऊ म्हटल्यावर शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर न वापरण्याच्या सूचना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या […]











