अनैतिक संबंध ठेवण्यासाठी होणाऱ्या छळामुळे महिलेने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाकूर तालूक्यातील येलमवाडी येथे घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आईने फोनकरुन सांगितले की, बहिण मंगल हिने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. […]
ताज्याघडामोडी
महिलेची अटक टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याकडून 10 हजार लाचेची मागणी
तक्रारदार व्यक्ती,त्याची पत्नी आणि मुलगा यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदाराच्या पत्नीस अटक न करण्यासाठी १० हजार लाचेची मागणी करून त्यापैकी ७ हजार रुपये स्वीकारल्याने पुणे लाचलुचपत विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे व लाचलुचपत विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई करत […]
महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. राज्यात सत्ता असतानाही महाविकास आघाडीने सर्वसामान्य जनतेवर लादलेला बंद आणि ठिकठिकाणी केलेल्या हिंसाचाराविरोधात मंगळवारी भाजपच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुजय पत्की यांनी ही याचिका दाखल केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात […]
अतिवृष्टी व पूरग्रस्तांना दिलासा; ठाकरे सरकारने जाहीर केली १० हजार कोटींची मदत
राज्यातल्या पूरग्रस्त तसंच अतिवृष्टी बाधितांसाठी आता ठाकरे सरकारने मोठी मदत जाहीर केली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात आलेल्या पूरामुळे तसंच अतिवृष्टीमुळे […]
बदनामी टाळण्यासाठी गॅलरीत लपायला गेली अन्…; इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू
बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मसाज पार्लरमध्ये खंडणी मागायला आलेल्या तिघांच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मसाज पार्लरमध्ये येत एक लाख रुपये द्या, अन्यथा पोलिसांना बोलवू अशी धमकी दिली होती. त्यामुळे समाजात बदनामी होईल या भितीने बदनामीपासून वाचण्यासाठी गॅलरीत लपायला गेलेल्या एका महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी […]
पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या
पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे केल्याची घटना घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केलाय. विशेष म्हणजे आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे धाडस केलं आहे. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती. तर अन्य नागरिकांनी घटनास्थळारुन थेट पळ काढला. या हत्याकांडामुळे पुण्यात […]
आमदार प्रशांत परिचारक पुन्हा आमदार होणार ?
नगर पालिका निवडणुकीपूर्वीच विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार ? सोलापूर जिल्ह्यात पुन्हा राजकारण तापणार असून विधान परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार प्रशांत परिचारक यांचा कार्यकाळ १५ डिसेंबर रोजी संपत असल्याने या महिना अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर करून ऑक्टोबरच्या मध्यात हि निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.डिसेंबर २०१५ मध्ये […]
परतीचा पाऊस झोडपणार! येत्या 24 तासात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. सध्या परतीच्या पावसाने राज्यातील काही भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच आता कोकण, मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत भागात 24 तासात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने नागरिकांना दिला आहे. येत्या 24 तासात राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पडणार आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच […]
पाच लाखाच्या लाचेची मागणी,९२ हजार स्वीकारताना वन संरक्षकास रंगेहाथ पकडले
एका वरिष्ठ स्तरीय वन अधिकाऱ्याला सोमवारी लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. सहाय्यक वनसंरक्षक बळीराम तुकाराम कोळेकर (57) असं अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोळेकर यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना त्याच्या सेवेसाठी अनुदान मिळणार आहे. […]
लस न देताच CoWin App वर नोंदणी, 10 शिक्षक निलंबित
लस न देता COWIN वर लसीकरण करण्यात आल्याचे दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात समोर आला आहे. या प्रकरणी प्राथमिक शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 2 जुलै रोजी हा प्रकार घडला असून तब्बल 3 महिन्यांनंतर तपासणीत एक व्हायल शिल्लक असल्याचे आढळून आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. मालेगावच्या संगमेश्वर भागातील केंद्रावर 2 जुलै रोजी […]











