ताज्याघडामोडी

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय! ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट

आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे.महिन्याच्या सुरूवातील पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. दरम्यान आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.  पुढील पाच दिवस राज्यात काही भागांमध्ये पाऊस जोरदार हजेरी लावणार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सासू-सुनेचं भांडण टोकाला;सुनेनं केली वयोवृद्ध सासूची हत्या

नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संभाजी चौक (नागोबा- मंदिर,जवळ) एका सुनेने स्वतःच्या ८० वर्षीय सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. ताराबाई शिखरवार असे हत्या झालेल्या वृद्ध सासूचे नाव आहे. तर पूनम आनंद शिखरवार असे हत्या करणाऱ्या आरोपी सुनेचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे हत्येची घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. प्रतापनगर पोलिसांनी आरोपी सुनेला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ पाटी; संशय येताच पोलिसांनी गाडी अडवली, कोट्यवधींचा गांजा जप्त

वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावून गांजाची तस्करी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी चार लाख रुपये किमतीचा ५२० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक दोनने नगर रस्त्यावर ही कारवाई केली. संदीप बालाजी सोनटक्के (वय २९, रा. रायगड), निर्मला […]

ताज्याघडामोडी

शिक्षक दिनाला 60 हजार शिक्षकांचा एल्गार, काळी फीत लावून शासनाचा निषेध करणार

राज्यामध्ये चार महिन्यांपूर्वी शिक्षक आणि शासकीय कर्मचारी, निम्नशासकीय कर्मचारी यांनी पेन्शनकरिता जोरदार आंदोलन केले. त्याचा फटका महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयापासून तर गावांच्या कार्यालयालादेखील बसला. त्यावेळेला शासनाने शिक्षकांच्या संदर्भात निर्णय करण्याचे आश्वासन दिले होते. (Teachers Pension Demand) परंतु अंशतः अनुदानावरील काम करणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. राज्यात शिक्षकांची रिक्त पदे भरण्या आली नाहीत. 1 नोव्हेंबर, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नवऱ्याने गर्भवती बायकोला वरवंट्याने ठेचलं, स्वत:चाही जीव घेतला; चिमुरडी रक्ताच्या थारोळ्यात रडत राहिली

पतीने गर्भवती पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काल शनिवारी सायंकाळी पाच वाजता बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) येथे उघडकीस आला. हा प्रकार आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री घडला असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत पत्नी गंगा ही आठ महिन्यांची गर्भवती आहे. गंगा धनाजी गायकवाड (वय […]

ताज्याघडामोडी

भीमा कारखान्याकडून ऊस बिले अदा,सभासदांमध्ये समाधान

गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपास ऊसाचे प्रति मे. टन २२०० रुपये प्रमाणे अदा भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपास आलेल्या सर्व ऊसाचे प्रति मे. टन २२०० रुपये प्रमाणे अदा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली. शनिवार दिनांक २ सप्टेंबर २०२३ रोजी डी.सी.सी बँकेच्या संबंधित शाखांमध्ये २०२२-२३ […]

ताज्याघडामोडी

तरुणाने चहा फुकट मागितला; हॉटेल मालकाने फटकारले, मनात राग ठेऊन मित्रांच्या साथीने धक्कादायक कृत्य

उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील खट्टन मल चौक येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. चहा फुकट न दिल्याने दुकानदाराला आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प ३ येथील खट्टन मल चौकात कन्हैया चहा दुकान आहे. याच दुकानाच्या […]

ताज्याघडामोडी

अजितदादा सरकारमध्ये आले आणि गद्दार, खोके बोलणं बंद झालं

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. आज मुंबईत विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक पार पडली तर महायुतीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजप यांची मुंबईच्या वरळी येथे बैठक सुरू आहे. या बैठकीत बोलताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला व विरोधकांच्या आघाडीला […]

ताज्याघडामोडी

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

शिवसेना पक्षप्रमुख ( उबाठा गट ) उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा रेल्वे रुळावर संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सुधीर मोरे यांनी रेल्वेपुढं उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील रुळांवर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

घरातील किरकोळ कारणावरून महिलेने उचलले टोकाचे पाऊल, १ वर्षाच्या मुलीसह संपवले आयुष्य

मुंबईतील घोडबंदर परिसरात एका धक्कादायक घडना घडली आहे. शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास एका विवाहीत महिलेने १ वर्षाच्या मुलीसह सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेची नोंद कासारवडवली पोलिस ठाण्यात झाली आहे. घोडबंदर भागात राहणाऱ्या प्रियंका मोहिते वय २६ हिने मुलगी ध्रुवी वय १ वर्ष हिच्यासोबत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यात दोघींचाही मृत्यू झाला. पतीने तिला […]