ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात व्याख्यान संपन्न

एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात बुधवार दिनांक २३ मार्च २०२२ रोजी “क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स अँड पेटेन्ट फायलिंग” याविषयावर डाॅ. भालचंद्र केळकर व डाॅ. सुहासराव खांबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. या व्याख्यानाचे […]

ताज्याघडामोडी

“…नाहीतर आम्ही ‘मातोश्री’वर मोर्चा काढू, शिवसेनेवर बहिष्कार टाकू”; ब्राह्मण समाजाचा इशारा

शिवसेनाचे प्रवक्ते विनायक राऊत यांनी आठ दिवसांत ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा काढू असा इशारा ब्राह्मण समाज समन्वय समितीने दिला आहे. “शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही” असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप घेतला आहे. काल म्हणजेच मंगळवारी (२२ मार्च २०२२ रोजी) औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘मुळशी पॅटर्न’ची थराराक घटना, तरुणावर कोयत्याने सपासप वार करून संपवलं

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन हत्या केली आहे. एखाद्या सिनेमाला शोभावी अशी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20, सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली.) […]

ताज्याघडामोडी

केंद्राने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, आता फक्त ‘या’ दोन गोष्टी पाळाव्या लागणार

कोरोनाचा आलेख उतरता असून रुग्णसंख्याही रोडावली आहे. दोन वर्षांपासून धुमाकूळ घालणारा कोरोना आता कुठे आटोक्यात येत असल्याचे दिसताच केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून लागू असणारे कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केले आहेत. जनता कर्फ्यू लागू करून आज बरोबर दोन वर्ष झाले आहेत. या काळात रुग्णसंख्या कोट्यवधींचा […]

ताज्याघडामोडी

अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणार – दिलीप वळसे-पाटील

अवैध धंदे बंद करण्याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाकडून माहिती घेऊन या परिसरात अवैध धंद्यांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली. अवैध धंद्यांबद्दल आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, ज्या पोलीसठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु आहेत आणि अशा काही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

घराबाहेरील रहस्यमय चॉकलेट खाऊन 4 मुलांचा मृत्यू

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबातमीने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलं आहे. येथे एकाच घरातील चार मुलांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत येथील मुख्यमंत्री योगी यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेत चॉकलेट खाल्यामुळे या 2 ते 4 वयोगटातील मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. ही घटना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

बलात्काराचा गुन्हा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलाविरोधात दाखल करण्यात आला आहे. गजा मारणेचा २२ वर्षीय मुलगा प्रथमेश मारणेवर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अडीच वर्षांपासून पीडित तरुणी आणि आरोपी प्रथमेश मारणे एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान आरोपीने तरुणीला २७ ऑगस्ट २०२० ते १७ […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकरांनी दिला राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद रुपाली चाकणकर यांच्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. रुपाली चाकणकर यांच्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. चाकणकर या […]

ताज्याघडामोडी

“…तर माझी मुलगी आत्महत्या करेल”; जितेंद्र आव्हाड यांचं खळबळजनक वक्तव्य

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली़.  या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच आणली असून, ही मालमत्ता ६ कोटी ४५ लाखांची आहे. केंद्रीय संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये या कारवाईची जोरदार चर्चा असतानाच राज्याचे […]

ताज्याघडामोडी

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतक-यांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर इथे आज हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तर सातारा, सांगली जिल्ह्यात उद्या हलक्या सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र […]