सांगोलाः येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मधील मेकॅनिकल विभागाच्या श्रीयश ढोले, मयूर आतकर व शुभम बंडगर या ३ विद्यार्थ्यांची विंडवर्ल्ड इंडिया या कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.धनंजय शिवपुजे यांनी दिली. विंड वर्ल्ड हि भारतातील पवनचक्की मार्फत निर्माण होणाऱ्या विजेच्या वीज प्रकल्पांची उभारणी करणारी कंपनी असून तिचा अक्षय ऊर्जा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मोजक्या कंपनीत […]
Uncategorized
स्वेरीत ‘अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाचे’ थाटात उदघाटन
स्वेरीचा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष हा विद्यार्थ्यांना योग्य दिशा देईल पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी कोणतीही द्विधा स्थिती होऊ नये आणि पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळावी यासाठी स्वेरीच्या वतीने उघडलेल्या या मार्गदर्शन कक्षाचा बारावी उत्तीर्ण झालेल्या व उच्च शिक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के फायदा होणार आहे याचा मला […]
फॅबटेक फार्मसीच्या ९ विद्यार्थ्यांची विरको बायोटेक हैद्राबाद मध्ये निवड
सांगोला येथील फॅबटेक शिक्षण संस्था संचलित फॅबटेक औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता विरको बायोटेक हैद्राबाद यांच्यातर्फे प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात आली. यामध्ये फॅबटेक फार्मसी च्या ०९ विद्यार्थ्यांची विरचो बायोटेक हैद्राबाद मध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झाली. श्री. पी रघुराम रेड्डी -असिस्टंट जनरल मॅनेजर एच आर, श्री. केशवर्धन रेड्डी – मॅनेजर मॅनुफॅक्चरींग, श्री. लिंगैया – […]
डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात
स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयात सदर सुविधा उपलब्ध ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ची मान्यता मिळाली असून बुधवार, दि. २९ मे २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार, दि. २५ जून […]
उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी की, सदर घटनेतील फिर्यादी शंतनू भारत धोत्रे हा आहे. दिनांक २४//२०२४रोजी फिर्यादी हे गावातील मारुती मंदिराचे समोर रात्री ८.०० वा चे सुमारास होळीसणाचे निमित्त नैवेद्य दाखविणेस येवून मंदिराचे बाहेर नारळ फोडून थांबला असताना समाधान श्रीपती कसबे, सुदेश निवृत्ती कसबे, आकाश […]
शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड
विठ्ठल परिवारात ‘इतिहासाची’ चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत ‘विठ्ठल वाचला पाहिजे’ हीच जुन्या जाणत्या सभासदांची अपेक्षा सिन क्रमांक १ – १९९१ मध्ये कॉग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून त्यावेळी कॉग्रेसमध्येच असलेले स्वर्गीय कर्मवीर औदूंबरअण्णा पाटील आणि स्वर्गीय कर्मयोगी सुधारकपंत परिचारक यांच्यात जोरदार रस्सीखेच होती.अण्णांना शरद पवार यांनी उस्मानाबाद येथे बोलावून घेतले आणि कारखान्याकडे भरपूर पैसे शिल्लक आहेत.४ कोटी […]
सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प सोलापूर जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाने केला. वीरशैव लिंगायत समाजाचा मेळावा लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे झाला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हत्तुरे, श्रावण जंगम, देवणीकर, महादेव न्हावकर, राहुल पावले, मंचाचे शहर संयोजक चिदानंद मुस्तारे होते. मेळाव्याच्या प्रारंभी आद्य जगद्गुरू […]
माढ्यातून रणजितसिंह मोहिते पाटील हेच शरद पवार यांचे उमेदवार ?
सोशल मीडियावर मोहिते पाटील समर्थक व्यक्त करू लागले भाकीत आ.रणजितसिंह मोहिते पाटील आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा तूर्तास तरी अफवा ट्विटर हॅन्डलवरील मोदींचा आणि कमळाचा फोटो आजही कायम माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची मोठी उत्सुकता जशी या मतदार संघातील महविकास आघाडीच्या समर्थकांना लागली आहे तशीच उत्सुकता अकलूजकर […]
आ.प्रणिती शिंदेनी पत्र लिहीत निवडणूक आयोगाचे सोलापूर जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईकडे वेधले लक्ष
पाणी पुरवठा उपाय योजनेसाठी आचार संहितेचा अडसर नको केली मागणी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून गावोगावी नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रतिवर्षी पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाटपासाठी प्रशासनासह विविध समाजसेवी संघटनांकडून पाण्याचे टँकर पुरवले जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे टंचाईग्रस्त भागात […]
माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पंढरपुरात शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक
माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार आणि पुढील रणनिती आखण्याबाबत पंढरपुरात दिनांक २९ मार्च रोजी सकाळी ठीक ११ वाजता महावीर नगर हॉटेल विठ्ठल इन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना नेते विनायक राऊत,शिवसेना नेते सुनील प्रभू ,शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या आदेशाने सदर बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती शिवसेना उबाठा गटाचे पंढरपूर विभाग जिल्हा […]











