Uncategorized

फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजच्या ३ विद्यार्थ्यांची विंडवर्ल्ड कंपनीमध्ये निवड

सांगोलाः येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज  मधील मेकॅनिकल विभागाच्या श्रीयश ढोले, मयूर आतकर व शुभम बंडगर या ३ विद्यार्थ्यांची विंडवर्ल्ड इंडिया या कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.धनंजय शिवपुजे यांनी दिली.

 विंड वर्ल्ड हि भारतातील पवनचक्की मार्फत निर्माण होणाऱ्या विजेच्या वीज प्रकल्पांची उभारणी करणारी कंपनी असून तिचा अक्षय ऊर्जा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मोजक्या कंपनीत समावेश होतो, असे ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. तन्मय ठोंबरे यांनी सांगितले

 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज सदैव प्रयत्नशील असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट द्वारे निकाल लागण्याआधीच नोकरीची संधी फॅबटेक कॉलेज ने उपलब्ध करून दिल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय नरळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *