कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी अर्थिक अडचणीत आला आहे. अशा अस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत असतानाच महावितरण विभागाने शेतकऱ्यांशी समन्वय ठेवून आपली कार्यपद्धती सुरु ठेवावी असे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा लोकप्रतिनिधी आ. समाधान आवताडे यांनी सूचित केले आहे. महावितरण उपविभाग मंगळवेढा येथील आधिकारी, पदाधिकारी व शेतकरी यांची आ. समाधान आवताडे मंगळवेढा येथील त्यांच्या […]
Tag: #pvnnews
माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल; चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक वक्तव्य
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील गुरुवारी एका कार्यक्रमात उल्लेख माजी मंत्री म्हणून करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी त्यानंतर माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका, असे म्हटले आहे. सर्वांच्याच भुवया चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे उंचावल्या आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सरकार येणार की दुसरा काही मोठा राजकीय भूकंप होणार अशी […]
चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला; मंत्र्याने दिला होता एन्काऊंटरचा इशारा
तेलंगणातील सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा मृतदेह घानपूर भागात रेल्वे रुळावर आढळला आहे. मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे या मृताची ओळख पटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करण्यात येईल, आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं तेलंगणाचे […]
युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय; संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांचं वक्तव्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. कारण आगामी निवडणुकीसाठी त्यांनी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी […]
योजनेत सहभागी व्हा अन् लाखोंची बक्षिसे मिळवा, पशुपालकांसाठी सुवर्ण संधी
शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसयाची ओळख आहे. त्याच अनुशंगाने पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणात व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारच्यावतीने राष्ट्रीय गोकूळ अभियान राबवले जात आहे. 15 सप्टेंबर ही सहभागी होण्याची शेवटचा तारिख आहे. त्यामुळे योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना आजच अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन वाढविण्याच्या दृष्टाने केंद्रसरकारचे प्रयत्न हे सुरु आहेत. त्या अनुशंगाने गोकुळ मिशन योजना […]
न्याय मिळत नाही म्हणत पेट्रोलचे कॅन,कोयते हातात घेऊन कुटूंब करकंब पोलीस ठाण्यात
आत्महत्येचा प्रयत्न आणि दहशत माजविल्याचा गुन्हा दाखल मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी करकंब पोलीस ठाण्यात थरारक प्रकार घडला असून सकाळी 09/52 वा सुमारास पोलीस ठाणेस समोर गेटमधुन टाटा कंपनीची छोटा हत्ती एम एच 13 सी यु 7745 ही टमटम पोलीस ठाणे आवारामध्ये थांबली त्यामधुन मेंढापुर गावचे रहीवाशी असलेले पप्पु थोरात याने प्लस्टीकचे कन हातामध्ये धरुन उतरले.त्यानंतर […]
पंढरपुरात एकाच दिवशी ८ मटका एजंट ”फिगर” घेताना आढळले
सोमवार दिनांक १३ सप्टेंबर हा दिवस म्हणजे घरोघरी गौरी पूजनाचा दिवस.गौरी आगमन झाले कि अनेक कुटूंबातील कुटूंबकर्ते आजही तीन दिवस अनावश्यक रोखीचे आर्थिक व्यवहार थांबवत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळते. मात्र आकस्मात धनलाभ होण्याची आशा बाळगून असलेले काही ”अभ्यासू” गुंतवणूकदार सोमवार पासून नवीन लाईन सुरु होईल या आशेने शनिवार रविवार दोन दिवस घमासान अभ्यास […]
पत्नी आणि सासूच्या छळास कंटाळून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या
पत्नी आणि सासूच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरूण बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणीकाळभोर परिसरातील कदमवाक वस्तीवर घडली आहे. कुटुंबियांपासून वेगळे राहण्यास भाग पाडणे, घरच्यांसोबत बोलू न देणे असा त्रास या दोघींनी पीडित तरूणाला दिला होता. या छळाला कंटाळून तरूणाने स्वयंपाकघरात गळफास घेउन आत्महत्या केली. रोहित असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी […]
शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करता येणार; छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश
राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. हा निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्त भाव दुकानांची पुनर्रचना करण्याबाबतची […]
१८ वर्षीय तरुणीचा धक्कादायक मृत्यू, टूथपेस्ट ऐवजी चुकून विषारी औषधाने घासले दात
दात घासल्याशिवाय आपल्या कोणाच्याच दिवसाची सुरुवात होत नाही. पण याच दात घासण्यावरून मुंबईत काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या धारावी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील […]