ताज्याघडामोडी

शाळांमधील क्लार्क,शिपायांची भरती होणार आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर !

शाळेतील शिपाई, क्लार्स कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरावे. ही पदं रद्द झाली आहेत किंवा ती भरायची नाहीत, असा कुठलाही निर्णय झालेला नाही. ही पदं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरायची आहेत आणि त्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे. पण ही पदं गरजेची असतील तेवढीच भरावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.कायम स्वरुपी काढून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पद भरतीला राष्ट्रवादीच्या आमदारांनीच विरोध केला आहे. त्यावर अजितदादांनी भूमिका स्पष्ट केली. 
         चारच दिवसापूर्वी शासनाने निर्णय घेत शाळांमधील शिपाई पदे पारंपरिक पद्धतीने भरता येणार नाहीत असे आदेश दिले होते.या नंतर राज्यातील शाळांमध्ये आता शिपाई हे पदच नसणार अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून प्रकाशित झाल्या होत्या.यावर आज स्पष्टीकरण देताना शिपाई पदे रद्द केली जाणार नसून गरजेप्रमाणे ती कॉटॅक्ट बेसिसवर भरण्याची पध्द्त अवलंबिली जाणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *