ताज्याघडामोडी

रिक्त जागेवर पात्र प्राध्यापक भरती तात्काळ करा- आमदार दत्तात्रय सावंत, वरिष्ठ  महाविद्यालयाच्या विविध प्रश्नावर मंत्री सामंत सोबत चर्चा

रिक्त जागेवर पात्र प्राध्यापक भरती तात्काळ करा- मा आ दत्तात्रय सावंत

वरिष्ठ  महाविद्यालयाच्या विविध प्रश्नावर मंत्री सामंत सोबत चर्चा 

 

पंढरपूर प्रतिनिधी – राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयामध्ये अनेक जागा रिक्त आहेत तर दुसरीकडे पात्र सेटनेट धारक उमेदवार भरतीची वाट पाहत आहेत, त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्राध्यापक भरती तात्काळ करावी अशी मागणी मा आ दत्तात्रय सावंत यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचेकडे केली.शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे प्रयत्नातून   राज्यातील अन्य विधानपरिषद आमदार व अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक दि १६ सप्टेंबर २०२० रोजी मुंबई येथे संपन्न झाली. सदर बैठकीत महाविद्यालयीन प्राध्यापकांचे,  विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी यांचे महत्वाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्या संदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा संपन्न झाली. या बैठकीत विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी यांना तात्काळ सातवा वेतन आयोग मिळावा अशी आग्रही मागणी मा आ सावंत यांनी केली. यावर मंत्री सामंत यांनी न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून इतरांना तात्काळ सातव्या वेतन आयोगाचा लाभ देणेत येईल असे सांगितले. परीक्षा बहिष्कार कालावधीतील ७१ दिवसाचे थकीत वेतन देणे, यशवंत राव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधील कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करणे तसेच कायम विना अनुदानित महाविद्यालयांच्या संदर्भातील ‘कायम’ हा शब्द काढून टाकणे व त्याअनुषंगाने असणारे विविध प्रश्नांवर चर्चा झाली. वरिष्ठ महाविद्यालयात २३ ऑक्टोबर १९९२ ते १८ ऑक्टोबर २००१ या कालावधीत कार्यरत असलेल्या बिगर नेट सेट प्राध्यापक यांना सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालामधून जुनी पेन्शन योजना लागू केली असून त्यांना नियुक्तीच्या प्रथम दिनांकापासून सीएएस चे लाभ देणे बाबतचा अंतरिम आदेश आशा बिडकर व अन्य यांना प्राप्त असून  तसा शासन निर्णय सर्वासाठी निर्गमीत करण्यात यावा, या कालावधीतील बरचसे प्राध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत व काही मयत आहेत त्यामुळे त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याना पेन्शन चे लाभ मिळत नसून त्यांचे खूप हाल होत आहेत, याबाबत मा आ सावंत यांनी अतिशय आक्रमकपणे मांडली  केली, त्याला मंत्री सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे समवेत पुढील आठवड्यात दुसरी मीटिंग लावण्यात येईल असे सांगितले. 

 या बैठकीला पुणे विभाग शिक्षक  मतदार संघाचे मा आ दत्तात्रय सावंत, आ मनीषा कायंदे, मा आ श्रीकांत देशपांडे,  आ बाळाराम पाटील ,मा आ सतिश चव्हाण, शिक्षक सेनेचे ज.मो.अभ्यंकर इत्यादी उपस्थीत होते.

 

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध मागण्या संदर्भात सुटा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ एच के आवताडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांनी सर्व शिक्षक आमदारांना पत्र देऊन मागणी लावून धरली होती.

राज्यातील हजारो शिक्षक तासिका तत्वावर वरिष्ठ महाविद्यालयात सेवा करीत आहेत, त्यांचे वेतन एक वर्षापासून थकीत आहे तरी त्यांचे  थकीत वेतन लवकर देऊन यापुढे त्यांचे वेतन दरमहा करण्यासाठी शासन आदेश निर्गमित करावा अशी मागणी मा आ दत्तात्रय सावंत यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *