ताज्याघडामोडी

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे ईको फ्रेंडली श्री गणेश प्रतिष्ठापना व पूजन”

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे
ईको फ्रेंडली श्री गणेश प्रतिष्ठापना व पूजन

शनिवार, दि.२२.०८.२०२० रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे गणेश चतुर्थीचे औचित्य साधून प्रशालेमध्ये इको फ्रेंडली गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यांस “वृक्ष गजानन” पर्यावरण पूरक गणेशमुर्ती’ असे नामकरण करण्यात आले. या गणेशमुर्तीचे पूजन संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचा सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मंत्रपुष्पांजली व आरती करुन “गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया” या जयघोषात गणरायाचे आगमन करण्यात आले. प्रशालेचे शिक्षक श्री नारायण कुलकर्णी यांनी मंत्रपुष्पांजली, मंत्रोच्चार व श्री गणेश आरती म्हणून वातावरण गणेशमय करुन टाकले.
श्री गणेश प्रतिष्ठापना केल्यानंतर सर्वांनी गणेशाचे दर्शन घेतले व त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
रासायनिक रंग आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करा या दर वर्षी होणाऱ्या आवाहनामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे यावेळी प्रशालेने योजिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *