पंढरपूर कोर्टी- येथील न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक मधील अंतिम वर्षातल्या आठ विद्यार्थ्यांची इटॉन पुणे या नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून त्यांची निवड झाली अशी माहिती संस्थेचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी दिली त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मेहनत, कष्ट व सातत्यपूर्ण अभ्यास या आपल्या कौशल्याच्या जोरावर कॅम्पस मुलाखतीतून विविध ठिकाणी कार्यरत आहेत व यापुढेही कॅम्पस मुलाखतीतून निवड होऊन विद्यार्थी स्वतःचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
इटॉन पुणे ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी असून या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना डिप्लोमा पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने पालकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रेनिंग ऑफ प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड यांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांना हे एक उंचीचे शिखर गाठण्यास मदत झाली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही एक आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब यांच्याकडूनही शुभेच्छा देण्यात आल्या . त्याचप्रमाणे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.