ताज्याघडामोडी

न्यु सातारा कॉलेज येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

न्यु सातारा समूह मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मराठी ग्रंथ वाचन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, मराठी ग्रंथ प्रदर्शन हे उपक्रम राबविण्यात आले. तसेच या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या अंतर्गत प्राध्यापक बिपिन कुलकर्णी सर यांचे ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमासाठी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नानासाहेब निकम साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमावेळी संस्था प्रतिनिधी ज्ञानेश्वर शेडगे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर कमी करून जास्तीत जास्त मराठी वाचन करावे असे त्यांच्या भाषणात सांगितले तर कॉलेजचे प्राचार्य विक्रम लोंढे सर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना रोज नवीन मराठी पाच शब्द संग्रहित करून आपला मराठी शब्द संग्रह वाढवण्याचे सुचवले. सदर कार्यक्रमास ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती आदिती कांबळे मॅडम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *