गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुण एकाएकी बेपत्ता; काँग्रेस आमदाराच्या घरात मृतावस्थेत सापडला; पोलिसांना वेगळीच शंका

बिहारच्या नवादा येथील काँग्रेस आमदाराच्या घरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हिसुआ येथील काँग्रेस आमदार नीतू सिंह यांच्या घरात एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. परिसरातील नागरिकांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

हे प्रकरण हिसुआ विधानसभेच्या नरहाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पियुष कुमार उर्फ सुद्दू असे २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. ज्याचा मृतदेह सापडला तो पियुष हा आमदाराचा वैयक्तिक सहकारी प्रिन्स कुमारचा भाऊ असल्याचं सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच नवादाचे एसपी अंबरीश राहुल, राजौलीचे एसडीपीओ पंकज कुमार आणि मेस्कौर पोलिस स्टेशनचे पोलिस आमदारांच्या घरी पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी एफएसएल आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण केले, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तपास सुरूच होता. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

सध्या पियुषच्या हत्येचे कारण समोर आलेले नाही. स्थानिक लोकांनी सांगितले की आमदार २५ ऑक्टोबरपासून पाटण्यात होते आणि घर रिकामे होते. आमदारांच्या कुटुंबातील एकही सदस्य घरी उपस्थित नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *