डोंबिवली जवळील कोळे गावात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी त्या महिलेसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
मृत मारुती हंडे हे संध्या सिंह या महिलेसोबत लिव्हइन रिलेनशिपमध्ये डोंबिवली जवळील कोळेगाव परिसरात राहत होते. काही दिवसापूर्वी संध्या हिची गुड्डू शेट्टी नामक व्यक्तीशी मैत्री झाली. संध्याचे गुड्डूशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय मारुतीला होता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू झाले होते.
काल दुपारच्या सुमाला संध्या आणि मारुती या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी गुड्डू देखील घरात उपस्थित होता. दरम्यान गुड्डू आणि संध्या यांनी दोघांनी संतापाच्या भरात मारुती यांना बॅटने बेदम मारहाण केली. यामध्ये मारुती यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी महिला संध्या, तिचा मित्र गुड्डू शेट्टी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.