कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
भारतातील महाविद्यालये आणि विद्यापीठांना कौशल्य-आधारित प्रशिक्षण (तांत्रिक आणि सॉफ्ट स्किल्स), मूल्यांकन आणि कॅम्पस प्लेसमेंट सेवा देणारी “प्रोफाउंड” कंपनी असुन अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील राम नवनाथ नागणे, मनिषा दत्तात्रय खिलारे, वासवी दत्तात्रय कौलवार, आकांक्षा तानाजी जाधव, स्वाती शंकर गाडेकर आदी ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.
“प्रोफाउंड” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
