ताज्याघडामोडी

पंढरीत झळकला ‘आपलं पंढरपूर’चा दिमाखदार फलक

 

पंढरपुरातील चौकात आपल्या पंढरपूरच्या वैभवात भर घालण्याच्या उद्देशाने परिचारक समर्थक कार्यकत्यांने अतिशय आकर्षक असा आपलं पंढरपूरचा फलक नुकताच उभारला.माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते या फलकाचे लोकार्पण देखील करण्यात आले.मात्र हाच फलक द्रूष्टीस पडल्यानंतर कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरजित पाटील यांनी एक पत्र लिहले असून हे पत्र सोशल मीडियावर देखील मोठे चर्चिले जाऊ लागले आहे.पहा आपल्या खरमरीत पात्रात काय म्हणाले आहेत अमरजित पाटील. 

 

आपल्या पंढरपूरची लाज वाटू द्या,अमरजित पाटील यांचे खरमरीत पत्र

पंढरपूरातील इंदिरा गांधी चौकातून जात असताना समोर आपलं_पंढरपूर असे लाईट मध्ये लावलेले दिसले.माझ्या ओळखीचे असणारे आणि बहुतेक भाजपाचे पदाधिकारी असणारे अनिकेत_मेटकरी या हरहुन्नर्री युवकांने हे लावण्याचे समजले.हे आपलं_पंढरपूर लावण्यामागे लावणार्याची भावना निश्चितीच चांगली असणार आहे.त्याबद्दल तो आणि त्याच्यातील कलाकार

अभिनंदनास पात्र आहे.
परंतु,आपले पंढरपूर शहर हे आपलं_पंढरपूर म्हणून अभिमानेने जगाला सांगावे असे काय आहे आपल्या पंढरपूरात ? आपल्या पंढरपूरात स्वच्छतेच्या मातोश्रीला अश्व लागललेला असताना ही या शहराला स्वच्छतेचा केंद्रिय पुरस्कार मिळतोय हे सांगायचे का ? आपल्या पंढरपूरात धुळ इतकी आहे की ती तुम्ही गोळा करुन किलोवर विकून अमेरिकेत सेटल होण्याची स्वप्ने पाहू शकता हे सांगायचे काय ? आमच्या पंढरपूरात रस्त्यावर येवढे खड्डे आहेत की एक वेळ चंद्रावर सुद्धा येवढे खड्डे नाहीत म्हणून अभिमान बाळगायचा का ? या शहरातील आरोग्य,स्वच्छता,पाणीपुरवठा,रस्ते,पथदिवे,आतिक्रमणे,बेकायदेशीर डिजीटल बोर्ड याला जबाबदार सहा सात आकडी पगार घेणारे गेंड्याच्या कातडीचे नगरपरिषदेचे अधिकारी किती माजोर्डे आहेत याचा एखादा पुरस्कार मिळावा म्हणून सांगायचे का ? २२ ते २४ झोपडपट्ट्यांचे बकाल शहर म्हणून सांगायचे का ? रहदारीचा का कमिनखोरीचा नेमका कशाचा अभिमान सांगायचा ? हे एकदा ठरल्यावर आपलं_पंढरपूर सांगता येईल.
ज्यांनी मार्गदर्शक म्हणून मिरवूण घेतले आहे.त्यांनी या सगळ्या प्रश्नांचे आणि समस्यांचे निर्माणकर्ते आपणच आहोत हे अपयश एकदा मान्य करावे.आपल्या सात मजली अहंकारातून जरा जमिनीवर उतरुन आपण या गावाचे नेमके काय करुन ठेवले आहे हे उघड्या डोळ्यांनी पहावे.एक पंढरपूरकर म्हणून आपल्याला ज्या गोष्टीची खरे तर लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी आपण अभिमानाने कशा काय मिरवू शकतो ? याचा हि सर्वांनी विचार करावा.एखादे शहर कसे नसावे हे कुणाला बघायचे असल्यास अशांनी विशेष मार्गदर्शना खालील आपलं_पंढरपूर एकदा बघून जावे.
आपला
अमरजित पाटील.
तालुकाध्यक्ष,पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी.
संस्थापक,कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *