ताज्याघडामोडी

रेल्वेतच काँग्रेसच्या ‘या’ दोन आमदारांनी केला महिलेचा विनयभंग

रेवांचल एक्सप्रेस मध्ये एका महिला प्रवाशाने काँग्रेसचे महासचिव सिद्धार्थ कुशवाह, सुनील सराफ यांच्यावर अश्लीलतेचा आरोप केला होता. या घटनेचा माहिती महिलेना रेल्वे मंत्रालयाला ट्विट करुण दिली होती. जीआरपी कंट्रोल रूम जबलपूरकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सागरमध्ये ट्रेन थांबवून आमदारांची चौकशी करण्यात ( होती. या प्रकरणी सुनिल सराफ यांनी सांगितले की, महिलेने केलेले आरोप जर तिच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगितले. तर, आम्हाला सर्व आरोप मान्य आहेत. यासोबतच आमदारांनी संबंधित महिलेने त्यांच्या सोबत शिवीगाळही केल्याचा आरोप केला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री 1:30 च्या सुमारास प्रफुल्ल शर्मा नावाच्या व्यक्तीने ट्विट केले होते की, त्यांची पत्नी ए 1 कोचमध्ये असलेल्या रेवांचल एक्स्प्रेसमध्ये सतना ते भोपाळ प्रवास करत आहे. माझ्या पत्नीसोबत काही जणांनी छेडछाड केली आहे. या प्रकरणी रेल्वे मंत्रालयाने तातडीने जीआरपी जबलपूर नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली. जीआरपी जबलपूर नियंत्रण कक्षाच्या माहितीवरून पोलिसांनी सागर रेल्वे स्थानकावर गाडी थांबवून डब्याजवळ जाऊन चौकशी केली.

आमदारांनी शिवीगाळ विनयभंग केल्याचा महिलेचा आरोप होता. याबाबत आमदार म्हणाले की, माझ्या सीटवर संबंधित महिला बसली होती. महिलेला सीटबद्दल विचारले असता तिने आम्हाला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. याप्रकरणी जीआरपीने एक कॉन्स्टेबल, एएसआयला महिलेसह भोपाळला पाठवले होते, त्यानंतर महिलेच्या अहवालावरून दोन्ही आमदारांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रेवांचल एक्स्प्रेस सागर रेल्वे स्थानकावर थांबली असता, जीआरपी आरपीएफच्या पथकाने एवन कोचमध्ये जाऊन चौकशी केली होती. याबाबत आमदार सुनील सराफ यांनी सांगितले की, महिलेने जर तिच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन केलेले आरोप सत्य आहे, असे सांगितले तर, आम्हला सर्व आरोप मान्य आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *