गुन्हे विश्व

धक्कदायक घटना ,जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाकडून ७ विच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल 

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सातवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर लैंगीक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील बाललैंगिक अत्याचाराची  घटना ताजी असतानाच आंबेगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत बाललैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. यासंदर्भात, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन, शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

जून 2022 ते 24 ऑगस्ट 2022 मध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिक्षक बाबाजी उमाजी घोडे याला अटक करण्यात आली असून मंचर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, केंद्रप्रमुख कांताराम महादू भोंडवे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत जिल्हा परिषदेला तक्रार प्राप्त झाली होती आणि लगेचच प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीचे अहवाल आल्यानंतर आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *