ताज्याघडामोडी

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला

पोलीस तपासात पुढे आली धक्कादायक माहिती

वणी तालुक्यातील नायगाव ईथल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार तिचा पती असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. शिरपूर पोलिसांनी या प्रकरणाचा बाईकाईने तपास करून गुन्ह्याचा उलगडा केला. 

वैशाली चल्लावार असे हल्ल्यात जखमी शिक्षिकेचे नाव आहे. शाळा सुटल्यावर त्या चंद्रपूर येथे परतण्यासाठी प्रवासी वाहनाची वाट बघत असताना मोहम्मद राजा अब्बास अंसारी या बिहारी युवकाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला, यात शिक्षिकेच्या कानाला जखम झाली, पोलिसांनी हल्लेखोरास पकडले मात्र आधीही शिक्षिकेवर असे हल्ले झाले असल्याने पोलिसांनी बारकाईने तपास केला त्यात धक्कादायक माहिती पुढे आली. 

शिक्षिकेचा पती असलेला जितेंद्र मशारकर यानेच पत्नीची जिवे मारण्याची सुपारी दिल्याचे समोर आले. या प्रकरणी हल्लेखोर मोहम्मद पती जितेंद्रसह संजय पट्टीवार अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. तसेच या घटनेतील आणखी एक आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *