ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या बाळू वाघमारेची “क्वेस्ट ग्लोबल” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी

“क्वेस्ट ग्लोबल” हि कंपनी एरोस्पेस आणि संरक्षण, ऑटोमोटिव्ह, ऊर्जा, हाय-टेक, वैद्यकीय उपकरणे, रेल्वे आणि सेमी कंडक्टर उद्योगांमध्ये जागतिक उत्पादन अभियांत्रिकी सेवा प्रदान करत आहे. “क्वेस्ट ग्लोबल” कंपनीचे यूएस, कॅनडा, सिंगापूर, यूके, जर्मनी, इटली, स्पेन, स्वीडन, रोमानिया, जपान आणि भारतासह 17 देशांमध्ये ५६ ठिकाणी “क्वेस्ट ग्लोबल” हि कंपनी कार्यरत असुन या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील बाळू वाघमारे यांची विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेले कोर्टी (ता. पंढरपूर ) येथील बाळु गोरख वाघमारे यांची पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील कॅम्पस मुलाखतीतून “क्वेस्ट ग्लोबल” इंजिनिअरींग सर्विसेस प्रा. लि. कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली आहे. “क्वेस्ट ग्लोबल” या कंपनीकडून बाळू वाघमारे यांना वार्षिक ३ लाख पगार मिळणार आहे.

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये प्रत्येक वर्षी २०० हुन अधिक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मुलाखत घेण्यासाठी येत असतात. यावर्षी महाविद्यालयातील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे. निवड झालेल्या कंपनीकडून विद्यार्थ्यांना तीन लाखांहून अधिक वार्षिक पॅकेज मिळाले आहे. प्रत्येक वर्षी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज चा प्लेसमेंटचा आलेख वाढत आहे. यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.

बाळू वाघमारे यांच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. राजेंद्र पाटील आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *