“शिवसेना बाळासाहेब गट” या नावाने ओळखला जाणार
शिवसेनेत खबळजनक बंड झाले आणि एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३९ आमदार हे एकत्र येत भाजपशी हातमिळवणी केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी आरूढ झाले.मात्र १ ऑगस्ट रोजी सर्वोच न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले असून शिंदे समर्थक १६ आमदार अपात्र ठरतील असा दावाही संजय राऊत हे करीत आहेत.शिंदे समर्थक आमदारांना कुठल्यातरी पक्षात प्रवेश करावा लागेल.तरच त्यांचे विधानसभा सदस्यत्व अबाधित राहू शकते असा दावाही करण्यात येत असतानाच आज शिंदे गटाने आपले इरादे स्पष्ट केले असून पक्षाचे नवीन नावही निश्चित केले असल्याचे समजते.आज दुपारी ४ वाजता या बाबत अधिकृत माहिती दिली जाईल असेही प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
‘शिवसेना बाळासाहेब गट’ असं नाव ठेवण्यात आले आहे,अशी प्राथमिक माहिती असून यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचं स्पष्ट झाले आहे.