ताज्याघडामोडी

आयुष्यातील शेवटचा पेपर ठरला; परीक्षेनंतर पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा धरणाच्या गाळात पाय रुतून मृत्यू

नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. धरणात पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचां बुडून मृत्यू झाला आहे. परीक्षेनंतर हे दोघे जण आपल्या मित्रांसह विरचक्क धरण परीसरात फिरायला गेले होते.

मुक्त विद्यापीठाचा पेपर दिल्यानंतर या दोन मृत मुलांसह 8 जण विरचक्क धरणात पोहायले गेले होते. यातील राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोघांचा मृत्यू झाला आहे. तलावात गाळ असल्याने यात पाय रुतून मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर धरण परिसरात परिवाराचा आक्रोश पहायला मिळाला.

तरुण मित्रांसह नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक्क धरणात पोहायला गेले होते. सध्या मुक्त विद्यापीठाचा पेपर सुरू असल्याने आज शेवटचा पेपर होता. तो पेपर आपटून विद्यार्थी एकत्र पोहोण्यासाठी गेले होते. जिजामाता महाविद्यालय येथील मुक्त विद्यापीठाचे ते विद्यार्थी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *