ताज्याघडामोडी

पुणे पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस अधीक्षक कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच तेथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याने त्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे (वय ३५, राहणार पिंपरी गवळी, ता. पारनेर, जि. नगर) असं सदर पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्याविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे.

    जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे हे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे. त्यांच्याविरूद्ध सुपे पोलीस ठाण्यात पत्नीच्या फिर्यादीवरून २०१८ मध्ये खुनाचा प्रयत्न आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पती-पत्नीचं पटत नसल्याने त्यांचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात दाखल असून त्यावर सुनावणी सुरू आहे. असं असताना मांडगे यांच्याविरोधात ७ जानेवारी २०२२ रोजी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खोटा गुन्हा असल्याचा त्यांचा दावा आहे.

त्यांच्याविरूद्ध सुपे पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. २०१८ मध्ये खुनाचा प्रयत्न आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा त्यांच्या पत्नीने दाखल केला होता.त्यांनतर पती-पत्नीचे पटत नसल्याने त्यांचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात दाखल असून त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यातच मांडगे यांच्याविरोधात ७ जानेवारी २०२२ रोजी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा खोटा आरोप असून स्थानिक पोलीस त्रास देत असल्याचा आरोप करून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळलो असल्याचे सांगून मांडगे सायंकाळी रॉकेलचा डबा घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. त्यानंतर एका अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *