गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बायकोचा मोबाइल पाहिला, तिने नवऱ्याच्या डोळ्यातच खुपसली कात्री!

दुसऱ्याचा मोबाइल विनापरवानगी पाहणं काही वेळा महागात पडू शकतं. उत्तर प्रदेशात बागपतमध्ये एका पतीला पत्नीचा मोबाइल अशा प्रकारे पाहिल्याचा फटका बसलाय. अनेकदा सांगूनही नवऱ्यानं हातातला मोबाइल खाली ठेवला नाही, त्यामुळे बायकोनं असं काही केलं, ज्यामुळे नवऱ्याला दवाखाना गाठावा लागला.

मोबाइल ही आता गरजेची आणि खासगी गोष्ट बनलीय. त्यात अनेक आवश्यक व खासगी गोष्टींची माहिती असते. त्यामुळे एकमेकांचे मोबाइल हाताळणं चुकीचं ठरतं. अगदी नवरा-बायकोमध्येही काही वेळा हे लागू होतं. उत्तर प्रदेशात बागपतमध्ये बायकोचा मोबाइल तिच्या परवानगीशिवाय पाहणं नवऱ्याला चांगलंच भोवलं. नवरा मजेमध्ये बायकोचा मोबाइल पाहत होता. इतकंच नाही तर यू-ट्यूबवर गाणी ऐकत होता. तेव्हा पत्नी आली व तिने आपल्या मोबाइलला हात न लावण्यास सांगितलं; पण नवऱ्यानं ऐकलं नाही. त्यामुळे रागावलेल्या पत्नीनं नवऱ्याच्या डोळ्यात कात्री खुपसली. बायकोच्या अशा वागण्याचा अजिबात अंदाज नसलेल्या नवऱ्याला या हल्ल्यामुळे चांगलीच जखम झाली. नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलंय.

बडौत पोलीस ठाण्याच्या परिसरातल्या विकास कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. नवरा अंकित यानं पत्नी प्रियांकाच्या विरुद्ध तक्रार दाखल केल्याचं पोलीस अधिकारी सविरत्न गौतम यांनी सांगितलं. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्नीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *