Uncategorized

स्वेरीत प्रा. अमितकुमार शेलार यांच्या पुस्तकाचे डॉ.बी.पी. रोंगे यांच्या हस्ते प्रकाशन

पंढरपूर (संतोष हलकुडे)- स्वेरीचे माजी विद्यार्थी व माळेगाव (ता. बारामती) येथील प्रा.अमितकुमार रामचंद्र शेलार यांच्या ‘ब्युटीफुल एन्काउंटर इन लाईफ’ या इंग्रजी भाषेमधून असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांचे पीएच.डी. साठी मुख्य मार्गदर्शक असलेले स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या हस्ते करण्यात आले. 
             प्रा. अमितकुमार शेलार यांनी २०१४ साली स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग (कॅडकॅम) विभागातून पदव्युत्तर पदवी अर्थात एम.ई.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी  मार्गदर्शक म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली संधी मिळाली. दरम्यान ‘अनुभवाचे बोल’ आणि ‘काल्पनिकता’ या विषयावर प्रा.शेलार यांनी ‘ब्युटीफुल एन्काउंटर इन लाईफ’ या पुस्तकाचे लेखन केले. मैत्रीचे घट्ट नाते, सामाजिक उपक्रम व माणुसकी यासारख्या विविध विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक वाचकांच्या निश्चित पसंतीस उतरेल. प्रा. शेलार हे सध्या माळेगाव तंत्रनिकेतन महाविद्यालयात ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. शेलार यांचे साधारण १५४ पानी अर्थात चौतीस हजार शब्दांचे सुंदर गुंफण असलेले हे पुस्तक संपूर्णपणे इंग्रजी भाषेत आणि सहज समजेल असे आहे. त्यांचे पुस्तक ‘नोशन प्रेस मेडीया प्रायव्हेट लिमिटेड’ने प्रसिद्ध केले असून या पुस्तकाची किंमत १९९ रु. आहे. तसेच हे पुस्तक https://notionpress.com/read/beautiful-encounter-in-life या व इतर लिंक वर देखील उपलब्ध असून पुस्तक मागणीनंतर जवळपास १३० हून अधिक देशात या पुस्तकाची उपलब्धता आहे. पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.राऊत, स्वेरीचे माजी विद्यार्थी प्रा. पुरुषोत्तम पवार, स्वेरीचे विश्वस्त एच.एम.बागल, प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *