ताज्याघडामोडी

राज्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 36 हजार नव्या रुग्णांची नोंद, 13 जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज एकाच दिवसात 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 8,907 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण 65 लाख 33 हजार 154 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96.17 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.08 इतका झाला आहे. राज्यात सध्या 5 लाख 85 हजार 758 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये असून 1368 व्यक्ती या संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ओमायक्रॉनचे 79 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 57 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात आजपर्यंत ओमायक्रॉनच्या एकूण 876 रुग्णांची नोंद झाली आहे.

आज आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 79 रुग्णापैकी 57 रुग्ण मुंबईतील आहेत. तर ठाणे महानगरपालिकेतील 7, नागपूर सहा, पुणे महानगरपालिका 5, पुणे ग्रामीण 3 आणि पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णाचा समावेश आहे. 

मागील सहा दिवसातील रूग्ण संख्या 

5 जानेवारी – 26 हजार 538

4 जानेवारी – 18 हजार 466 रूग्ण

3 जानेवारी – 12, 160 रूग्ण

2 जानेवारी – 11, 877 रूग्ण

1 जानेवारी – 9,170 रूग्ण

31 डिसेंबर – 8067 रूग्ण

मुंबईत 20 हजार रुग्णांची नोंद

मागील 24 तासांत मुंबईत 20 हजार 181 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *