पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे एम.एस.सी.बी.च्या पाठीमागे असलेल्या बिरोबा देवस्थानची एक एकर पाच गुंठे जागा असून त्यामध्येच बिरोबाचे देवस्थान आहे.महादेव सुखदेव देवकर हे सदर बिरोबा मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहतात.मंदिरासमोरील सभामंडपाच्या नूतुणीकरणीकरिता जि.परिषद सोलापूर फंडातून सभापंडपाकरिता 05 लाख रूपये मंजूर झाल्याने सदर मंडपाचे काम सुरु करण्यात आले आहे.
पूर्वीचा जुने व निर्जीव झालेला सभा मंडप पाडण्यात येत आहे.दिनांक 17/11/2021 रोजी दुपारी01/00 वा.चे सुमारास महादेव सुखदेव देवकर हे मंदिराच्या कामाची पाहणी करावी व बिरोबाचे दर्शन करण्याकरिता मंदिराजवळ आले असता तेथे आलेल्या गावातील अंकुश विठ्ठल काळे याने फिर्यादीस कोणाला विचारून सभामंडप पाडला असे म्हणून मला शिविगाळी करीत जवळच पडलेली लाकडी काठी हातात घेवून मारहाण केली अशा आशयाची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
