Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांचा ग्लोबल महाराष्ट्र स्टुडन्ट ऑफ द फ्युचर मध्ये सहभाग

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी ग्लोबल महाराष्ट्र स्टुडंट फ्युचर इनिशिएटिव्ह व्हिडिओ कॉन्फरन्स म्युनिक जर्मनीमध्ये सहभाग नोंदविला. भारताचे अमृत महोत्सवी वर्ष आणि विद्यार्थी दिवस याचे औचित्य साधून जर्मनीत राहणाऱ्या मराठी नागरिकांनी हाती घेतलेल्या ग्लोबल महाराष्ट्र या उपक्रमात राज्यातील चारशेहून अधिक शाळांमधून शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. जर्मनी मधील भारतीय परराष्ट्र सेवेतील मराठी अधिकारी डॉक्टर   सुयश यशवंतराव चव्हाण यांनी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. जर्मनीमधील शिक्षणाच्या संधी व करिअर याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. जर्मनीमध्ये शिक्षण विनाशुल्क दिले जाते. तसेच स्कॉलरशिप हि दिली जाते. यावेळी भारतीय वाणिज्य दूतावासचे  मोहित यादव ,खासदार प्रियंका चतुर्वेदी,सकाळ समूहाचे संपादक व संचालक श्रीराम पवार जर्मनीतील महाराष्ट्र मंडळाचे प्रमुख अभिजीत माने,सदस्य प्रीती राव, दुर्गा खटखटे, केदार जाधव,ऋतुजा शेटे या सर्वानी  विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रीती राव यांनी महाराष्ट्र मंडळातर्फे मराठी ग्रंथालय, मराठी व्यक्तीस मार्गदर्शन,स्थानिक दिवाळी अंक हे उपक्रम जर्मनीमध्ये सुरू केल्याचे सांगितले.

     माय मराठी शाळा योजनेची माहिती दुर्गा खटखटे यांनी दिली. केदार जाधव यांनी जर्मन भाषा व शिक्षणातील नवीन संधी याबद्दल माहिती दिली.  या कॉन्फरन्ससाठी इयत्ता नववी मधील सुप्रिया पवार, रिया कुमठेकर, इयत्ता आठवी मधील रुद्राक्ष शिंदे, आर्यन घाडगे, इयत्ता सातवी मधील आदर्श स्वामी, कृष्णा विटेकर या विद्यार्थ्यांबरोबर डॉक्टर   सुयश चव्हाण यांनी संवाद साधला .  या कॉन्फरन्ससाठी शाळेतील  सर्व शिक्षक उपस्थित होते. संस्थेचे  चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर भाऊसाहेब  रूपनर यांनी या कॉन्फरन्सचे कौतुक केले. संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे व प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये फॅबटेक पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *