ताज्याघडामोडी

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेवर बारामतीत केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापा

बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे गुरुवारी (दि. ७) केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. ईडी अथवा आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एका पॉवरफुल्ल नेत्याच्या नगर जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकटवर्तीयाची या पथकाकडून चौकशी केली जात आहे. काटेवाडीत हा निकटवर्तीय राहतो. दुसरीकडे बारामती एमआयडीसीतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत एक पथक पोहोचले आहे. त्यांच्याकडून कंपनीत तपासणी केली जात आहे.

ईडी अथवा आयकर विभाग यापैकी एका विभागाकडून ही चौकशी

ईडी अथवा आयकर विभाग यापैकी एका विभागाकडून ही चौकशी सुरु आहे. यासंबधी अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही. परंतु भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बारामती दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ही छापेमारी सुरु झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *