ताज्याघडामोडी

राज्यातील वारकरी संप्रदाय वर्गाची नोंद करण्यात येणार

कीर्तनकारांना शासनाकडून मानधन देण्यात यावे कीर्तनकार हे समाजप्रबोधनाचे काम करतात.महाराष्ट्रात जातीयता आणि सामाजिक भेदभाव दूर करण्यात वारकरी संप्रदायाचा आणि कीर्तनकारांचा खूप मोठा वाटा आहे.ज्या प्रमाणे सांस्कृतिक कला सादर करणाऱ्या कलालाकरांना शासन मानधन देते त्या प्रमाणेच वयोवृद्ध कीर्तनकाराना मानधन देण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षपासून केली जात आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे माध्यमातून समजा प्रोबधन करणारे राज्यातील सुमारे तीस हजार महाराज मंडळींना महाराष्ट्र शासनाने त्वरित कायमस्वरूपी दरमहा मानधन सुरू करण्यात यावे. तसेच कोरोना लॉक डाऊन काळात तातडीने प्रती महिना ५००० रुपये मानधन द्यावे, अशी मागणीही  करण्यात येत होती.आज मुबंईत  सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संतपीठ संदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वारकरी साहित्य परिषदेचे सचिव डॉ. सदानंद मोरे, पंढरपूर आणि आळंदीचे महाराज आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत वारकरी सांप्रदायिक कीर्तनकारांची नोंदणी करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही  सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

 

ज्ञानोबा, तुकाराम आणि इतर संत परंपरा, फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारसरणी यामुळे जसे महाराष्ट्राला ओळखले जाते तसेच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणूनही एक वेगळी ओळख आहे. या वारकरी संप्रदायासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संतपीठ संदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वारकरी साहित्य परिषदेचे सचिव डॉ. सदानंद मोरे, पंढरपूर आणि आळंदीचे महाराज आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.देशमुख म्हणाले की, आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृह आयोजित करण्यात आलेल्या संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील विविध भागातील वारकरी उपस्थित होते. आजच्या या संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने वारकरी सपंद्रायाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात 5 हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे.

राज्यातील कलाकार आणि वारकरी संप्रदाय वर्गाची नोंद घेण्यात येईल. राज्यातील वृद्ध कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ करण्यात येईल.आज या निमित्ताने वारकरी संप्रदायाने शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य असून या संप्रदायाकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे.आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाने केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *