सध्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले असून पेट्रोलचे दर अनेक शहरांमध्ये नव्वदीपार गेले आहेत. त्याचबरोबर डिझेलही प्रचंड महागले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचे जुने ट्विट दाखवत पेट्रोल-डिझेलचे दर काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात वाढल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर यांनी ट्विट करून टीका केली होती. अमिताभ यांनी युपीए सरकारच्या काळात केलेली काही ट्विट, त्याचबरोबर अक्षय कुमार व अनुपम खेर यांनी केलेल्या ट्विटवरून भाई जगताप यांनी सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे.
