मराठा आरक्षणाचा प्रश्न गेले अनेक महिने राज्यात गाजत आहे. याच प्रश्नावरून राज्यातील खासदार गुरूवार २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे.या भेटीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडे वेळ मागितली होती. तसंच महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचं आवाहन केलं होतं. […]
ताज्याघडामोडी
अनाथ विद्यार्थ्यांना देणार मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
अनाथ विद्यार्थ्यांना देणार मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.., पंढरपूर प्रतिनिधी दि.01- कोरोना काळात पंढरपूर तालुक्यातील अनेक कुटुंबातील सदस्यांना प्राण गमवावे लागले तर काही मुलांचे मातृ-पितृ छत्र हरवले अशा अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना पालकत्व स्विकारण्यासाठी वसंतराव काळे शैक्षणिक संकुल पुढे सरसावले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब व खासदार सुप्रियाताई सुळे […]
तालुक्यातील पाच गावांतील निर्बंध शिथिल
तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील पाच गावांमध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतत पालन केले आहे. या गावांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने पाच गावांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. तालुक्यातील ग्रामीण कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता […]
स्त्री रोग तज्ञ् डॉक्टर असलेल्या भाजप पदाधिकाऱ्या विरोधात विनयभंगाची तक्रार
बीड जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारीयांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारने राजकीय आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवत निषेध नोंदवला आहे.तर व्यापारी संघटनेने बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे बीड […]
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर दगडफेक
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. अशोक चव्हाणांच्या नांदेड येथील घरावर ही दगडफेक झाली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेने दगडफेक केली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली […]
लसीकरणात भारताचा नवा विक्रम, एका दिवसात तब्बल 1.32 कोटी नागरिकांना डोस
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यात, लसीकरणातून एक चांगली बातमी आली आहे.कोरोना लसीकरणाबाबत भारतात एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. भारताने एका दिवसात 1 कोटी 32 लाखांहून अधिक लसीचे डोस देऊन स्वतःचा जुना विक्रम मोडला. 31 ऑगस्ट रोजी एका दिवसात 1 कोटी 32 लाख 45 हजार 266 डोस दिले गेले. यामध्ये 1 कोटी 35 हजार 652 […]
वाळू चोरीची वाट अडवणाऱ्या शेतकऱ्यास ग्रामपंचायतीसमोर बोलवून बेदम मारहाण
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल नदीकाठी शेती असणारा शेतकरी म्हणजे मळई रानाचा नशीबवान मालक म्हणून ओळखला जातो.पण पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरील काही गावांमध्ये वाळू चोरांनी घातलेला हैदोस नदीकाठची शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला असून अनेक गावातील मुजोर वाळूचोर वाळूची वाहने नदीपात्रातून वर काढण्यासाठी बेधडकपणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता काढत असल्याचे अनेक वेळा […]
24 तासांत राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा; 6 जिल्ह्यांना अधिक धोका
गेली दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. आजही राज्यात पावसाची स्थिती कायम आहे. आज दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी […]
सातत्याने तक्रार येणा-या हाॅस्पिटलवर यापुढे गुन्हे दाखल करण्यात येणार
जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने आता पर्यंत २२ हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्णांच्या बिलांचे ऑडिट करून तब्बल १७ कोटी ३४ लाख रुपये कमी केले आहेत. यापुढे सातत्याने तक्रार येणा-या हाॅस्पिटलवर यापुढे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाकाळात रुग्णालयांनी आकारलेल्या आवास्तव बिलांच्याविरोधात […]
भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं
कल्याण तहसील कार्यालयात 1 लाख २० हजारांची लाच घेताना तहसीलदार व त्यांच्या शिपायाला लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच नगर जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या. जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना शिरुर येथील […]











